You are currently viewing भाजपा वाढीसाठी कोकण व मुंबई यामध्ये समन्वयकाची भुमिका बजावणार

भाजपा वाढीसाठी कोकण व मुंबई यामध्ये समन्वयकाची भुमिका बजावणार

–  डाॅ. सुभाष आरोसकर, उपाध्यक्ष – कोकण विकास आघाडी, मुंबई .

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तालुका कार्यालयात डाॅ. सुभाष आरोसकर यांचा सत्कार

वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावचे मुळचे रहिवासी असलेले व भाजपा चे कोकण विकास आघाडी , मुंबई चे उपाध्यक्ष डाॅ. सुभाष आरोसकर यांनी तालुका कार्यालयात भेट दिली असता तालुक्याच्या वतीने प्रदेश कार्यकारणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी मार्गदर्शन करताना डाॅ. सुभाष आरोसकर म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या कार्यकतृत्वावर भाराऊन जाऊन मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे . जिवन विद्या मिशन या सेवाभावी संस्थेत गेली २५ ते ३० वर्षे नामधारक म्हणून काम करत असताना सद्गुरु वामनराव पै माऊली व त्यांचे चिरंजीव प्रल्हाद दादा पै यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे .याच कार्याचा वसा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पण काम करत असल्याने आपणही भाजपा मध्ये प्रवेश केल्याचे सांगितले .
तसेच भविष्यात कोकण मधील ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी कोकण व मुंबई मधील समन्वयकाचे काम आपण कोकण विकास आघाडी चे अध्यक्ष सुहासजी आडीवरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचे सांगितले .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , नगराध्यक्ष राजन गीरप , जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके , जिल्हा का.का.सदस्य वसंत तांडेल , महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , माजी नगराध्यक्षा डाॅ. पुजा कर्पे , नगरसेविका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर , महिला मोर्चाच्या वृंदा गवडंळकर व रसीका मठकर , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व समीर नाईक , शक्ती केंद्र प्रमुख संतोष शेटकर , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , बुथप्रमुख शेखर काणेकर व नितीश कुडतरकर , दिगंबर आरोसकर व ओंकार चव्हाण इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा