You are currently viewing रूपेश राऊळ यांच्या माध्यमातून निरवडे आरोग्य केंद्राला तीन बेड…

रूपेश राऊळ यांच्या माध्यमातून निरवडे आरोग्य केंद्राला तीन बेड…

सावंतवाडी

निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी स्वखर्चाने आज तीन बेड उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे त्याचा फायदा होणार रूग्णांना होणार आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिकारी विक्रम मस्के यांनी त्यांचे आभार मानले. निरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला बेड उपलब्ध करून देऊ,असा शब्द राऊळ यांनी दिला होता.दरम्यान त्यांनी आज तीन बेड स्वखर्चातून उपलब्ध करून दिले आहेत
यावेळी निरवडे उपसरपंच चंद्रकांत गावडे, तळवडे सरपंच वनिता मेस्त्री,विनोद काजरेकर,सुभाष मयेकर,नीलेश शिरोडकर,अनिल जाधव,गौरव मेस्त्री,सचिन गावडे,निकिता जाधव आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा