You are currently viewing पाण्याचे मनोगत!

पाण्याचे मनोगत!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी यांची वृत्तबद्ध काव्य रचना*

*पाण्याचे मनोगत!*

*वृत्त— भुजंगप्रयात(य य य य)*

नभाते भरोनी विहारे कधी मी
विमुक्ते न पाशी नसे बंधनासी
समीरे मला छेडिता आडवाटे
धरेला मिळे तृप्त होती निवासी

निसर्गाक्रमे वृक्षराजी नगाते
ऋतूकालचक्रात अस्तित्व ढुंडे
अरे मानवा संपवी जीवनाते
नदी ताल ओढे रिकामेच हंडे

कुठे नीर वाहे भरोनी नळाते
नको ते नको होत ओसंडताही
कुठे एक थेंबास व्याकूळताना
फिरे कोरड्या बावि शोधी जळाही

निसर्गात सर्वां समानेव हक्का
मनुष्ये विभाजी रची प्रांत सीमा
अतीवर्षणे वा अनावर्षणेने
मला रोध होणे असे प्राप्तकामा

नदीजोड जो यत्न मोठा विचारी
उपाया करी हे जरी शासना ती
समाविष्ट होती सुखीजीव सारे
मलाही मिळे आत्मसंतुष्टता ती

—हेमंत कुलकर्णी,
नाहूर गाव, मुलुंड, मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा