You are currently viewing देवगडात प्रभाग 14 मध्ये विकासकामांचा शुभारंभ

देवगडात प्रभाग 14 मध्ये विकासकामांचा शुभारंभ

देवगड जामसंडे प्रभाग क्रमांक 14 मधील विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. विकास कामांमध्ये रानडे कॉलनी मुख्य रस्ता व अंतर्गत पोट खडीकरण व डांबरीकरण, पौर्णिमा आंबा बाग रस्ता खडीकरण व डांबरीकरण या दोन कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित चार विकास कामांसाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यात नाचणकर घर ते विशाल चौगुले घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, प्रभाकर भुजबळ पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, गणेश नगर मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे, थोपटेवाडी मुख्य रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अध्यक्ष नगरसेविका सेवक निवृत्ती उर्फ बुवा, माजी नगरसेविका हर्षा ठाकूर, अण्णा खवळे, महेंद्र भुजबळ, सौ गावकर, सौ मांलडीकर, चौगुले आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा