You are currently viewing डॉ.सुषमा पुजारी – सिद यांना राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार प्रदान 

डॉ.सुषमा पुजारी – सिद यांना राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार प्रदान 

इचलकरंजी : प्रतिनिधी

येथील गावभाग नदीवेस परिसरातील डॉ.सुषमा पुजारी – सिद यांना मानवतावादी सांस्कृतिक चळवळ दिशा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

डाॅ.सुषमा पुजारी – सिद यांनी वैद्यकीय व सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून अनेकांना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.या कार्याची दखल घेऊनच त्यांची राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.नुकताच कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या एका शानदार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण प्रमुख पाहुणे भरत रसाळे यांच्या हस्ते व प्रा.किसनराव कुराडे , डॉ.सोमनाथ कदम ,भरत लाटकर ,अनिल म्हमाने व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा