You are currently viewing प्लॅस्टीक, कागदी ध्वजाचा वापर करु नका – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

प्लॅस्टीक, कागदी ध्वजाचा वापर करु नका – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

प्लॅस्टीक, कागदी ध्वजाचा वापर करु नका – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

दरवर्षी 15 ऑगस्ट या राष्ट्रीय दिनी तसेच इतर महत्वाच्या कार्यक्रमांच्या व क्रीडा आयोजनांच्या दिवशी लहान आकारातील कागदी व प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होते. असे राष्ट्रध्वज विकत घेऊन दुसऱ्या दिवशी इतरत्र टाकले जातात, त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. यामुळे कागदी व प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज वापरु नयेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

             15 ऑगस्ट 2026 रोजी व त्यानंतर कागदी व प्लॅस्टीकचे राष्ट्रध्वज वापरु नयेत. राष्ट्रध्वज इतरत्र टाकू नयेत. राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा. तसेच सर्व नागरिक, सामाजिक संस्था, अशासकीय संस्था यासंदर्भात नेमण्यात आलेल्या शासकीय समित्या यांनीही इतरत्र पडलेले, खराब झालेले व फाटलेले राष्ट्रध्वज संकलित करावेत. तसेच कोणत्याही संस्थेने किंवा व्यक्तीने स्वतःहून गोळा केलेले राष्ट्रध्वज शासकीय समित्यांकडे द्यावेत. या समित्यांनी ते स्वीकारुन खराब व फाटलेल्या राष्ट्रध्वजांची विल्हेवाट ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार करावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा