You are currently viewing नारायण राणेंची वचनपूर्ती ; देवबाग बंधाऱ्याचे रविवारी भूमिपूजन

नारायण राणेंची वचनपूर्ती ; देवबाग बंधाऱ्याचे रविवारी भूमिपूजन

एप्रिल अखेरीस ना. राणेंनी बंधाऱ्यासाठी केली होती १ कोटी खासदार निधीची घोषणा

मालवण

सागरी अतिक्रमणग्रस्त देवबाग गावचे सागरी अजस्त्र लाटांपासून संरक्षण करण्यासाठी येथे तात्पुरता बंधारा बांधण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मागील महिन्याच्या अखेरीस एक कोटींचा खासदार निधी उपलब्ध करून देण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला आहे. ना. राणेंच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या खासदार निधीतून होणाऱ्या बंधाऱ्याचे भूमिपूजन रविवारी २२ मे रोजी सकाळी ११ वाजता ना. नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे.

ना. नारायण राणे यांनी एप्रिल मधील देवबाग गावातील संपर्क सभेच्या वेळी येथील संरक्षक बंधाऱ्यासाठी खासदार फंडातील एक कोटी रुपये बंधाऱ्यासाठी देण्याची घोषणा केली होती. भाजपा नेते निलेश राणे यांनी याबाबत पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर मंगळवारीच जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन खासदार फंडातील एक कोटी निधी मंजूर करून घेतले होते. पावसाळा येण्यापूर्वी या बंधाऱ्याचे तात्काळ काम सुरू करण्यासाठी निलेश राणे यांचे प्रयत्न असून या बंधाऱ्याचे भूमिपूजन रविवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होत आहे. तरी सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी तसेच जिल्हा पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, तालुका कार्यकारणी, सर्व आघाडीच्या अध्यक्षांनी व कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर मंडलचे प्रभारी अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + four =