You are currently viewing सातवे अ.भा.मराठी नक्षञ महाकाव्यसंमेलनाचा चिञकाव्य लेखन स्पर्धा,परिसंवाद,काव्यमैफल व प्रकटमुलाखतीने दोन दिवस रंगले

सातवे अ.भा.मराठी नक्षञ महाकाव्यसंमेलनाचा चिञकाव्य लेखन स्पर्धा,परिसंवाद,काव्यमैफल व प्रकटमुलाखतीने दोन दिवस रंगले

महाकाव्यसंमेलनाध्यक्ष कवी अशोक नायगावकरांनी महाकाव्यसंमेलनाने कविंच्या प्रतिभेला फुलण्याची संधी-असे प्रतिपादन.

नक्षञाचं देणं काव्यमंच,पुणे व सह्याद्री युथ फांऊडेशन,महाराष्ट वतीने सातवे अखिल भारतीय मराठी नक्षञ महाकाव्यसंमेलनचे आयोजन करण्यात आले.आचार्य अञे रंगमंदिर,पिंपरी,पुणे १८ येथे उत्साहात संपन्न झाले.महाकाव्यसंमेलनाचे उदघाटक म्हणुन श्रीमंत श्री मालोजीराजे भोसले महाराज (अक्कलकोट संस्थान,सोलापूर)उपस्थित होते.प्रमुख पाहुणे उद्योजक श्री कृष्णकुमार गोयल,पुणे,अॅड.प्रफुल्ल भुजबळ महाराज,डाॅ.कैलासभाऊ कदम,सुखदेवतात्या सोनवणे,नगराध्यक्ष सौ.शोभा कऊटकर,सौ,जया बोरकर,कर्नल साठे,आशिष कदम,इ.मान्यवर उपस्थित होते.

महाकाव्यसंमेलनाचे प्रास्ताविक प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी केले.स्वागताध्यक्ष शंभूदादा पवार,श्रीमंत मालोजीराजे महाराज भोसले,उद्योजक कृष्णकुमार गोयल,अॅड.प्रफुल्ल भुजबळ महाराज ,राजेंद्र धावटे,राजन लाखे,उदय सर्पे,प्रा.तुकाराम पाटील,जयंत भावे यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी महाकाव्यसंमेलन अध्यक्ष कवी अशोक नायगावकर यांनी अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले,”कवीला निरीक्षणाची तिक्षण नजर पाहीजे.समाजाच्या प्रखरतेला,वेदनेला टिपता आले पाहीजे.सांस्कृतिक भूक समाजाची भागण्यासाठी अशा महाकाव्यसंमेलनाची गरज आहे.”

आजवरच्या वाटचालीतील गमतीशीर आठवणी, विनोदी किस्से, सोबत हास्य कवितांची पेरणी. यामुळे हशा, टाळ्यांसह प्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर यांची प्रकट मुलाखत रंगतदार ठरली.

नक्षत्राचं देणं काव्यमंच व सह्याद्री युथ फाउंडेशनच्या वतीने दोन दिवसीय सातवे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष अशोक नायगावकर यांची प्रकट मुलाखत, मुलाखतकार श्रीकांत चौगुले व प्रीती सोनवणे यांनी घेतली. यावेळी प्रा. राजेंद्र सोनवणे व शंभुदादा पवार हे उपस्थित होते.

” वाईतील सांस्कृतिक वातावरणाने आणि विश्वकोशातील ग्रंथालयाने मला समृद्ध केले. सुरुवातीला भावकविता लिहायचो. मुंबईत आल्यावर नामदेव ढसाळांशी मैत्री झाली. त्यांच्याबरोबर सगळ्या झोपडपट्ट्या फिरलो .समाजातील दुःख दैन्य बघितले. त्यानंतर सामाजिक कवितांकडे वळलो.
कविता सादर करण्याच्या नायगावकरी शैलीबाबत विचारल्यावर ते दिलखुलास हसत म्हणाले.” माझी शैली सहजपणे विकसित झाली. मी आयुष्यात ठरवून कोणत्या गोष्टी केल्या नाहीत . कवितेच्या आधी किस्सेवजा बोलत गेलो, ते प्रेक्षकांना आवडत गेले. त्यातूनच ही वेगळी शैली विकसित झाली”.
मिशा आणि हशा हे तुमच्या बाबतीत समीकरण झालं आहे .यावर ते सहजपणे म्हणाले. ” माझ्या मिशांची एक वेगळी ठेवण आहे ,माझे हातवारे करणे. तुम्हाला सांगतो .असं म्हणत श्रोत्यांशी संवाद साधणे. हे लोकांना आवडत गेलं आणि एकच कवितासंग्रह नावावर असणारा हा कवी इतका लोकप्रिय झाला .याचं मलाही आश्चर्य वाटतं.” आपल्या परदेशातील कार्यक्रमांचा अनुभव सांगताना ते म्हणाले. “लोकसत्ताच्या हास्यरंग पुरवणीचा संपादक होतो. हास्यजत्रा या कार्यक्रमातही सहभागी होतो . पडद्यावरच्या दिसण्यामुळे लोकांना नाव आणि चेहरा माहीत झाला. त्यामुळे जगभरातील मराठी मंडळासाठी बोलावणे आले. कार्यक्रम केले.”
आपल्या गंभीर वळणाच्या कवितेबाबत बोलताना ते म्हणाले.” मी गंभीर, अंतर्मुख करणाऱ्या अनेक कविता लिहिल्या आहेत .भोपाळ दुर्घटनेवरील कविता तर ज्ञानपीठने प्रकाशित केली आहे.
कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक किस्से त्यांनी सांगितले. कविता वाचन केले .कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी शाकाहारी ही प्रसिद्ध कविता सादर केली. त्याला भरभरून दाद मिळाली.

“नख खुपसून अंदाज घेत, क्रुरपणे त्वचा सोलली जाते, दुधी भोपळ्याची.
सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप चालली आहे.
डोळ्यांची आग होते आहे. शहाळ्या नारळावर कोयत्याने दरोडा घातला आहे.
भाजले जाते वांग, निथळतयं त्वचेतून पाणी टप टप….!”

कवी अशोक नायगावकर यांना गौरवपञ,मानपञ,मानधनथैली,
पुणेरी टोपी,शाल,पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.या ढमहाकाव्यसंमेलनाच्या शेवटी सर्व सहभागी कवी कवयिञी यांना महाकाव्यसंमेलन स्मृतीचिन्ह,सन्मानपञ,गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
महाकाव्यसंमेलनाच्या नियोजनात पियुष काळे,मोहन कुदळे,विनायक विधाटे,राहुल परदेशी,देवा कुॅंवर,मंगेश बिरादार,मंगेश शेलार,संतोष कोराड,साईराजे सोनवणे,निखिल खोल्लम,गणेश सोनवणे,यशवंत घोडे,सिध्द चिलवंत,रोहीत शिंदे,सौ.वृषाली टाकळे,चंद्रकांत सोनवणे,दिनेश चव्हाण,सुनिल बिराजदार,संतोष आवटे,इ.पुढाकार घेतला.विश्वगीत पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा