You are currently viewing डॉ *.पंजाबराव देशमुख अकादमीची तीन दशकाकडे यशस्वी वाटचाल…..

डॉ *.पंजाबराव देशमुख अकादमीची तीन दशकाकडे यशस्वी वाटचाल…..

डॉ.पंजाबराव देशमुख अकादमीची स्थापना आम्ही १२ मे २००० रोजी अमरावतीला केली. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव ठाकरे साहेब यांचे प्रधान सचिव माननीय श्री विकास खारगे आय ए एस हे उपस्थित होते .या २२ वर्षांत मिशन आयएएसला जवळपास दोनशेच्या वर आयएएस आयपीएस आयएफएस सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा अधिकारी होऊ शकतो. त्याचे व्यक्तिमत्व चांगले व्हावे यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम केले आहे करीत आहोत आणि करणार आहोत. मिशन आयएएस हे ध्येय आम्ही डोळ्यासमोर ठेवून सातत्याने काम करीत आहोत .त्या काळामध्ये अनेकांचा हातभार आम्हाला लाभला आहे .त्यांचे आम्ही आभारी आहोत. फक्त एक रुपया एवढ्या नाममात्र फी मध्ये विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणारी महाराष्ट्रातील ही एकमेव संस्था आहे .त्याशिवाय संस्थेची दारे सर्व विद्यार्थ्यांसाठी सदैव उघडे असतात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही .आपण कलेक्टर होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले तर कोणती ना कोणती नोकरी आपल्या हातात हमखास पडेल किंवा मिशन आयएएस मध्ये सहभागी होणाऱ्या मुलांचे व्यक्तिमत्व इतके चांगले बनेल की तो कुठल्याही क्षेत्रात गेला तरी चमकल्या शिवाय राहणार नाही. मिशन आयएएसचा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे दुसऱ्या वर्गापासून मराठी इंग्रजी व सेमी या भाषातून स्पर्धा परीक्षेची तयारी .दुसऱ्या वर्गापासून आयएएसची ट्रेनिंग देणारी ही भारतातील एकमेव अकादमी आहे .याशिवाय स्पर्धा परीक्षा संस्कार शिबीर, ऑनलाइन मार्गदर्शन आयएएस विद्यार्थ्यांचे सत्कार स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व विदर्भ स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन असे कितीतरी उपक्रम डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीने सातत्याने राबविले आहेत. राबवित आहेत. आणि राबविणार आहोत. या सगळ्या प्रवासामध्ये आम्हाला तुमचे सहकार्य पाहिजे आहे आणि ते मिळेल अशी अपेक्षाही आहे .
==============
प्रा *डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस*
डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी अमरावती कॅम्प
444 602
मोबाईल 98 90 96 7003

प्रतिक्रिया व्यक्त करा