You are currently viewing चांगल्या संस्काराचे धडे बुध्द विहारातून – आ. नितेश राणे

चांगल्या संस्काराचे धडे बुध्द विहारातून – आ. नितेश राणे

अशक्य गोष्टी पुर्ण करण्याची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली.

निमअरुळे येथे बुद्ध विहाराचा जीर्णोद्धार लोकार्पण सोहळा संपन्न

वैभववाडी

उभरण्यात आलेले बुध्द विहार हे संस्कार केंद्र आहे. या विहारांमध्ये आल्यावर एक वेगळी ऊर्जा प्राप्त होत असते. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या बाबासाहेबांच्या ब्रीदवाक्याने आपण चालत आहोत. स्पर्धेत टिकायचे असेल तर खरा संघर्ष स्वतःच्या व्यक्तीमत्वाबरोबर केला पाहिजे. अशक्य गोष्टी पुर्ण करण्याची प्रेरणा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून मिळाली आहे. असे प्रतिपादन युवा नेते आमदार नितेश राणे यांनी केले.
निमअरुळे येथे बुद्ध विहार जीर्णोद्धार लोकार्पण सोहळा सोमवारी पार पडला.

आमदार नितेश राणे यांनी बुद्धविहारात जाऊन भगवान गौतम बुद्धांचे दर्शन घेतले. यावेळी सत्कार समारंभ पार पडला. दरम्यान नितेश राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी उपसभापती अरविंद रावराणे, शिवसेना नेते विजय रावराणे, श्रीधर अरुळेकर, श्री शिंदे, सरपंच सविता कदम, प्राची तावडे, सहदेव कदम, सरपंच उज्वल नारकर, उद्योजक विकास काटे, संजय सावंत, प्रकाश पाटील, मंडळाचे अध्यक्ष संदीप कदम, वासुदेव कदम, हर्षलता कदम, मंदार कदम, किशोर कदम, प्रवीण कदम व मान्यवर, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नितेश राणे पुढे म्हणाले, आपला भारत देश बाबासाहेबांच्या विचारांवर चालतो. शिक्षणाचे महत्त्व व का शिकले पाहिजे हे त्यांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिले पाहिजे. त्यांचे विचार अशा कार्यक्रमातून प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे. शिवसेना नेते विजय रावराणे व मी कित्येक वर्षे संपर्कात आहोत. आमचा हेतू स्पष्ट तो म्हणजे तालुक्याचा विकास. आणि विकासासाठी आम्ही निश्चित एकत्र येणार असे सांगितले.

निमअरुळे बौद्ध वाडीत घराघरात पिण्याचे पाणी पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते किशोर कदम यांचे नितेश राणे यांनी आभार मानले. गावच्या विकासासाठी निधी यापुढेही कमी पडू देणार नाही. असा शब्द या वेळी आमदार नितेश राणे यांनी दिला. बुद्ध विहारासाठी एक लाख रुपयांची देणगी यावेळी त्यांनी जाहीर केली. यावेळी विजय रावराणे यांनी मनोगत व्यक्त केले. मंडळाच्यावतीने आमदार नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वाडीतील वयोवृद्ध मंडळींचा तसेच किशोर कदम यांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने अरुळे व निमअरुळे गावातील ग्रामस्थ, महिला व युवक उपस्थित होते.

WhatsAppFacebookTwitterGmailShare

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − twelve =