You are currently viewing दिलदोस्ती

दिलदोस्ती

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.आदिती मसुरकर यांची स्नेहा मेळाव्यातील आठवणी ताज्या करणारी काव्यरचना

जमले दोस्त सारे
आंबोलीच्या घाटात
फुलला मळा हास्याचा
दिल दोस्तीच्या कुटुंबात

एक दिवस सौख्याचा
आनंद मौज मस्तीचा
गतकालीन स्मृतींना
प्रज्वलित करण्याचा

आनंदाने मैत्रिणी साऱ्या
झुल्यावर झुलत होत्या
रखरखीत उन्हातही
पाखरावाणी बागडत होत्या

विद्यार्थी बनून सारे
माकड चेष्टा करत होते
अनुभवांचे एकेक पान
मित्रांसमोर उलगडत होते

संचारला होता उत्साह
झाले होते प्रफुल्लित मन
टिपत होते कॅमेऱ्यात
अविस्मरणीय मजेचे क्षण

ठेवा तुम्ही एकदा तरी
जबाबदारीचे मुकुट खाली
स्वतःसाठी जगून पहा
टिकेल खरे हास्य गाली

*✒️© सौ आदिती धोंडी मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा