You are currently viewing पिकुळे येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

पिकुळे येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

दोडामार्ग :

 

आमदार दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते पिकुळे तिठा ते देऊळवाडी येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ शुक्रवारी श्रीफळ वाढवून करण्यात आला.

पिकुळेतील रस्ताप्रश्नी माजी वित्त व नियोजनमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आक्रमक भूमिका घेत ठेकेदार बदलल्याने अखेर पिकुळे तिठा ते पिकुळे देऊळवाडी रस्त्याचे काम सुरु झाले. त्यांच्या प्रयत्नानेच 2021-22 त्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला होता.

आमदार केसरकर यांच्या शिफारशी नुसार राज्य सरकारच्या आर्थिक अंदाजपत्रकात (बजेट) पिकुळे तिठा ते देऊळवाडी रस्त्यासाठी निधी देण्यात आला होता.

त्या रस्ताचे काम कोरोना काळात संबंधित ठेकेदाराकडून केले गेले नाही. तसेच गेले वर्षभर त्या ठेकेदाराने उर्वरित काम करण्यास दिरंगाई केल्याने त्या ठेकेदाराला बदलून दुसऱ्या ठेकेदाराला ते काम देण्यात यावे अशी सूचना आम. केसरकर यांनी कार्यकारी अभियंत्यांना केली.

त्यानुसार पहिल्या ठेकेदाराला बदलून नवीन ठेकेदाराला काम देण्यात आले. त्या उर्वरीत कामाचा शुभारंभ शुक्रवारी त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस, उपजिल्हा संघटक संजय गवस, कोनाळ विभाग प्रमुख संतोष मोर्ये, तिलकांचन गवस, संदीप गवस, उपविभाग प्रमुख व माजी सरपंच अनंत शेटकर, सरपंच दीशा महालकर, विनय गवस, ज्ञानेश्वर गवस, वसंत गवस , माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष संदीप गवस आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × three =