You are currently viewing सावंतवाडी-यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये उद्या “जॉब फेअर” चे आयोजन…

सावंतवाडी-यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये उद्या “जॉब फेअर” चे आयोजन…

सावंतवाडी

येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या वतीने उद्या स.९.३० वाजल्यापासून “जॉब फेअर” चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुणे येथील सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील ‘ट्रेनी अप्रेंटिस इंजिनियर्स’ च्या पोस्टसाठी इंटरव्ह्यूज घेतले जाणार आहेत. यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या शाखांमधील २०१८ ते २०२१ बॅचचे उत्तीर्ण विद्यार्थी तसेच २०२२ मध्ये तृतीय वर्षात शिकत असणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. तरी जॉब फेअरमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी कॉलेजचे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा.मिलिंद देसाई ९००४०९४८८३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा