You are currently viewing डोळ उघडा पत्र

डोळ उघडा पत्र

*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र, उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती, सांगली जिल्हा संस्थापक-अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख*

**डोळ उघडा पत्र**

‌‌ आपण आपल्या पूर्वजांचे काळात आणि त्यांच्या तोंडून ऐकले आहे की त्यावेळी कश्याप्रकारे पत्र व्यवहार आणि आपली मागणी तक्रार . अन्याय यासाठी कोणाकडे पत्र व्यवहार करावा अथवा पत्र पाठवून जाब विचारावा यासाठी कशी पध्दती होती . काही वेळा आपणं ऐकलं आहे की संदेशवहन करण्याचे काम ठराविक पक्षी प्राणी करत असतं . हे आपण ऐकल आहे. तर काही ठिकाणी गुप्तचर आपल्या राज्यातील काही गोष्टी झाडाच्या पानांवर लिहून पाठवत असत .

आज सर्व काळ बदलला आणि रोज चिठ्ठी पत्र घेऊन येणारा पोस्टमन आत्ता कमी दिसायला लागला . कारणं आत्ता मोबाईल. ट्विटर. व्हाट्सअप. ई-मेल. सपिड पोस्ट. अश्या विविध माध्यमातून आज शासकीय निमशासकीय. अथवा शुभकार्य. मयत. वाढदिवस. मागणी अर्ज. तक्रार अर्ज. ईशारा पत्र. आंदोलन इशारा पत्र . असे विविध माध्यमांचे संदेश निवेदन आज पाच मिनिटांत पोहचविले जातात. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे दाखल करायची औपचारिक पत्र सुध्दा देण्याचे काम आज आॅनलाइन होत आहे

दैनंदिन जीवनात आपल्या काही अडचणी सोडवण्यासाठी किंवा काही सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला शासकीय कार्यालयांत किंवा खाजगी कंपन्यांच्या कार्यालयांत जावे लागते. आपली कामे व्हावीत म्हणून या कार्यालयांत आपल्याला पत्रे सादर करावी लागतात. या पत्रांना ‘औपचारिक पत्रे’ म्हणतात.

कधी कधी आपल्याला त्रयस्थ व्यक्तींनाही काही कामानिमित्त पत्र लिहावे लागते. हेही ‘औपचारिक पत्र’च होय. आपली कामे कोणालाही त्रास न होता, बिनचूक व त्वरेने होण्यासाठी अशी पत्रे विशिष्ट पद्धतीने लिहिली जातात. त्यांची एक ठरलेली रूपरेषा असते. त्यात शिष्टाचार व उपचार पाळावे लागतात. या पत्रांत पाल्हाळ, फापटपसारा नसतो. कामाचे स्वरूप थोडक्यात व अत्यंत नेमकेपणाने स्पष्ट करावे लागते. मित्रांना किंवा नातेवाइकांना लिहिलेल्या पत्रात जशी सलगी व्यक्त होते, तशी सलगी औपचारिक पत्रात नसते. ही औपचारिक पत्राची वैशिष्ट्ये आहेत.

औपचारिक पत्रांचे स्थूलमानाने पुढीलप्रमाणे काही उपप्रकार मानले जातात :

निमंत्रणपत्र

आभारपत्र

अभिनंदन पत्र किंवा गौरवपत्र

चौकशीपत्र

क्षमापत्र

मागणीपत्र

विनंतीपत्र

तक्रारपत्र

स्व-परिचयपत्र

ई-मेलवरील पत्रलेखनाची एक विशिष्ट पद्धत आहे. पारंपरिक पत्रलेखनाहून ती थोडी वेगळी आहे. ई-मेलवरील पत्रलेखनाचे संकेतही थोडे वेगळे आहेत. यापुढे तंत्रज्ञानाच्या आधारेच पत्रव्यवहार प्राधान्याने होणार असल्याने त्या पद्धतीचा परिचय होणे आवश्यक

फॉर्म” असे म्हणतात. जसे की: सुट्टीसाठी पत्र, शुल्क निवारण पत्र, पात्र प्रमाणपत्र किंवा बँकेकडून कर्ज घेण्याची पत्र इ.

शुल्क माफी साठी प्रिंसिपल पत्र

प्रिंसिपलसाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज

शिष्यवृत्तीसाठी प्रधानाचार्य पत्र (2)

कर्तव्याच्या मोबदल्यासाठी प्राचार्यांना प्रार्थना पत्र

कॅरेक्टर सर्टीफिकेटसाठी अर्जाचा पत्र

क्षमापद्धतीसाठी प्राचार्यांना प्रार्थना पत्र.

गुन्हा केल्याबद्दल प्रिन्सिपलकडून माफी पत्र

नवीन संगणक शिक्षकांच्या प्रणालीसाठी प्रधानाचार्य पत्र

हस्तांतरण प्रमाणपत्र

शाळेत प्रभाग (अनुपस्थिती) वर प्रिंसिपलला पत्र

बँकेकडून व्यवसायासाठी कर्ज पावती पत्र

गृह कर्जासाठी अर्ज

प्रिंसिपल बदलण्यासाठी पत्र

विषय बदलण्यासाठी प्रिन्सिपल च्या विनंती

खोलीच्या छताशी संबंधित प्रिंसिपलला मुख्य पत्र

पुस्तक विक्रेत्याकडून पुस्तके विचारण्यासाठी पत्र

ग्रंथालयातून पुस्तके घेण्यास प्राचार्यांना प्रार्थना पत्र

तक्रार पत्र:

कोणत्याही वैयक्तिक किंवा सामाजिक समस्या टाळण्यासाठी आम्हाला संबंधित अधिकार्यांना अनेक वेळा पत्र लिहावे लागतात. या अक्षरे तक्रारी अक्षरे म्हणतात.

पाणी समस्यावर नगरपालिका पत्र

पोस्टच्या अनियमिततेच्या तक्रारीसाठी पोस्टमास्टरला पत्र

आरोग्य अधिकारी यांना त्याच्या घाणीच्या क्षेत्रात पत्र

जिल्हा अधिकारी यांना पत्र

जिल्हाधिकारीच्या रस्त्यावर अतिक्रमण केल्याच्या संबंधात

पोलिस स्टेशनवर पत्र

वीज पुरवठा समस्या समस्या

खाजगी पत्रक, नातेवाईक आणि मित्र इ. यांना अनौपचारिक पत्र लिहिली जातात. हे पत्र सहसा वैयक्तिक विषय आणि निमंत्रणासाठी लिहिले जाते. औपचारिक भाषेचा वापर अनौपचारिक पत्र लिहिण्याची गरज नाही. आमंत्रण पत्र, आईला पत्र, पित्याला पत्र इ. हे उदाहरण आहे.

इतिहासकालीन मराठी पत्रलेखन: भारतात मुसलमानी अमलात कागदाची उपलब्धता वाढल्याने विशेषत: राजकीय स्वरूपाचा पत्रव्यवहारही मोठ्या प्रमाणावर होत असे. त्यातूनच पत्रलेखनाचे तांत्रिक संकेतही निर्माण झाले. पण बडोद्याच्या गायकवाड ओरिएंटल ग्रंथमालेत प्रसिद्ध झालेल्या लेखपद्धति (१९२५) या पुस्तकात मुसलमानपूर्व काळातील पत्रलेखनासंबंधी विवेचन आढळते. वि. का. राजवाडे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या शक १८३२ च्या (इ. स. १९१०) अहवालात लेखनप्रशस्ति नावाचे एक प्रकरण (ग्रंथ) प्रकाशित केले. ते प्रकरण बहुधा मुळात असलेल्या प्रकरणास विद्यमान भाषेचे रूप देऊन लिहिले आहे. त्यात मुसलमानी व मराठी अमलात प्रचलित असलेल्या ७८ प्रकारच्या पत्रांची विवरणासह सूची दिलेली आहे. तथापि प्रत्यक्षात मात्र त्याहून अधिक प्रकारची पत्रे सापडतात. उदा., फर्मान, निशान, मनशूर, महजरनामा, कबालेपत्र, बेहडा, शुद्धिपत्र, दोषपत्र, देहझाडा इत्यादी. हे प्रकार म्हणजे शासकीय व इतर प्रपत्रांचेच विविध नमुने होत.

आज आपण असंच एक पत्र आपल्या महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील सर्व शासकीय प्रशासकीय अधिकारी व प्रत्येक जिल्ह्यातील पालक मंत्री यांना बांधकाम कामगारांवर होणारें अन्याय. बोगस कामगार नोंदणी. इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार यांचा मनमानी कारभार. राजकीय सामाजिक संघटना दादागिरी. विविध योजनेतील भ्रष्टाचार. प्रत्येक जिल्ह्यातील सहहयक कामगार आयुक्त कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी चौकशी. कामगार देण्यात येणारे विविध लाभ वैद्यकीय शैक्षणिक आर्थिक सुरक्षा याचा उपभोग खरोखरच कामगार असणारा लाभ घेतो का यासाठी चौकशी समिती. अश्या विविध कारणांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील समाजसेवक यांनी आजचं संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी पुढारी.नेते . खासदार. आमदार. मंत्री ‌यांना आपण आज पत्र लिहिणार आहोत.मला माहिती आहे आपले पत्र कचरयाचया टोपलीत जाणार आहे कारणं आपले शासन आणि राजकारण संघटना. याचं साटंलोटं आहे

*** पत्र**

* चौकशी समिती नेमणे बाबत*

प्रति

* मा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई

* पालकमंत्री सर्व जिल्हे

* सहहयक कामगार आयुक्त कार्यालय सर्व जिल्हे

* प्रांत तहसिलदार अधिकारी सर्व

तालुके

* जिल्हा पोलिस अधिक्षक सर्व जिल्हे

# विषय – बोगस कामगार नोंदणी व बोगस अनुदान घेणारे यासाठी जिल्हानिहाय समिती नेमणे बाबत

अर्जदार – एक कामगार

महोदय – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार यांच्यासाठी विविध शैक्षणिक. वैद्यकीय. आर्थिक. सामाजिक. सुरक्षा. अश्या विविध २९ योजना खरोखरच कामगार असणारे बांधकामाशी निगडित. विद्युत पारेषण विभाग. धरणे कालवे बंधारे. टाॅवर बांधणी. अवजड काम अश्या ठिकाणी काम करणारे त्यांचे वय १८/६० अस आहे. ज्यांना रजिस्ट्रेशन असणारे इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार यांनी नोंदणी दाखला देऊन. मंडळांची विहित फी भरून या योजनांचा लाभ घेता येतो

बोगस कामगार नोंदणी हा आजचा सर्वात मोठा प्रश्न आपल्यापुढे आ वासून उभा आहे. विविध कल्याणकारी योजनांचा लाभ खरोखरच कामगार असणारे यांना मिळतच नाही.इंजिनिअर ठराविक रक्कम घेऊन नोंदणी दाखले देत आहेत. यामुळे आज मंडळांचे कोट्यवधी रुपये पाण्यात जात आहेत.

जिल्ह्यात आज सुरक्षा संच वाटप सुरू आहे. कामगार सुरक्षा मंडळांचे ध्येय आहे. पण आज प्रत्येक जिल्ह्यात वाटप होणारे सुरक्षा संच व त्यातील विविध वस्तू यांचा निकृष्ट दर्जाचे आहे . आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे वाटप करण्यात आलेले सुरक्षा संच बांधकाम कामगार यांच्यापेक्षा महिलांना ७५/ टक्के आत्तापर्यंत वाटप झाले आहे. सुरक्षा संच हा बांधकाम कामगार यांच्या सुरक्षेसाठी आहे पण आज कोठेही कोणताही बांधकाम कामगार याचा वापर करत नाही.

* जिल्ह्यातील नोंदणीकृत संघटना

* बोगस दाखले देणारे इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार

* भ्रष्ट सहहयक कामगार आयुक्त मधील अधिकारी व कर्मचारी

* सुरक्षा संच वापर तपासणी पडताळणी

* पुरुष बांधकाम कामगार व महिला कामगार चौकशी

* बोगस आर्थिक लाभ घेणारे कामगार व त्यांना सहकार्य करणारे अधिकारी व कर्मचारी चौकशी

अश्या विविध मागणीसाठी आम्ही सर्वजण कामगार मिळून आपणाकडे न्याय व दाद मागण्यासाठी पत्र व्यवहार केला आहे तरि सर्व जिल्हे स्तरावर एक चौकशी समिती नेमण्यात यावी त्यासाठी खरोखरच कामगार असणारे त्या समितीत दोन सदस्य घेण्यात यावेत . अन्यथा सर्व चोर मिळून मंडळांचे लचके तोडायला कमी करणार नाहीत.

आपणं आपल्या स्तरावर आमच्या मागणीचा विचार करावा आणि सर्व गोरगरीब बांधकाम कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा .

कळावे आपला विश्वासू

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा