You are currently viewing आजगाव साहित्य कट्ट्याची एकोणीसावी सभा

आजगाव साहित्य कट्ट्याची एकोणीसावी सभा

आजगाव दि १३:

आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याची एकोणीसावी सभा शुक्रवार दिनांक २० मे रोजी सायंकाळी पाच वाजता आजगाव वाचनालयात आयोजित केली आहे.

या सभेत ‘माझे जीवन माझे वाचन’ या विषयावर सौ. माधुरी काकतकर-आठल्ये या आपले विचार मांडतील. सौ. आठल्ये या नवी मुंबईच्या रहिवासी असून सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. बालपणापासून ‘पुस्तक वाचन’ हा त्यांचा छंद आहे. त्यांच्या वैयक्तिक संग्रहात सुमारे पाचशे पुस्तके असून त्या नेहमीच विकत घेऊन पुस्तके वाचतात.

अलिकडे त्या कविता, लेख असे लिखाण करतात. त्यांचे हे लिखाणही रसिकमान्य होत आहे.

त्यांचे विचार ऐकण्यासाठी या सभेस सर्व साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन कट्ट्याचे संघटक विनय सौदागर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा