You are currently viewing कणकवलीत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव २०२२ सोमवार १६ मे रोजी

कणकवलीत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव २०२२ सोमवार १६ मे रोजी

कणकवली तालुका बुद्धविकास संघ मुंबई, शाखा कणकवलीचे आयोजन

कणकवली

कणकवली तालुका बुद्धविकास संघ मुंबई, शाखा कणकवलीच्या वतीने विश्वशांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जयंती महोत्सव २०२२ सोमवार १६ मे २०२२ रोजी कणकवली बुद्धविहार येथे संपन्न होणार आहे.कणकवली तालुका बुद्धविकास संघ मुंबई चे अध्यक्ष आयु अनिल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.

सोमवार दि. १६ मे २०२२ रोजी सकाळी ११.०० ते ११.१५ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करून ,सकाळी ११.१५ ते ११.४५ बुद्ध पूजा पाठ, सकाळी ११.४५ ते १२.१५ स्वागत व प्रास्ताविक, सकाळी १२.१५ ते ०१.१५ व्याख्यान, दुपारी ०१.१५ ते ०२.०० अध्यक्षीय मनोगत, आभार व समारोप-अल्पोपहार.असा कार्यक्रम राहणार आहे.बुद्धविकास संघ मुंबईचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन बुद्धविकास संघ मुंबई शाखा कणकवली चे अध्यक्ष डी.डी. कदम,उपाध्यक्ष रवींद्र तांबे,सरचिटणीस सुनील तांबे,खजिनदार संजय कदम,सहसचिव संघवी तांबे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा