You are currently viewing आरोस सोसायटी चेअरमनपदी विजय नाईक

आरोस सोसायटी चेअरमनपदी विजय नाईक

व्हाईस चेअरमनपदी योगेश नाईक यांची बिनविरोध निवड

बांदा

आरोस विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.च्या चेअरमनपदी विजय नाईक तर व्हाईस चेअरमनपदी युवासेना सावंतवाडी तालुकाधिकारी योगेश नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

त्यामुळे सोसायटीवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले. ग्रामस्थांनी संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या. बिनविरोध झालेल्या निवडणुकीत नारायण मोरजकर, आनंद नार्वेकर, हरिश्चंद्र नाईक, संतोष पिंगुळकर, गुरुनाथ नाईक, शिवाजी परब, केशव नाईक, नर्मदा नाईक, लक्ष्मी देऊलकर, विठ्ठल शेळके, राम आरोसकर यांची संचालकपदी निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.आर.आरोंदेकर यांनी काम पाहिले.

यावेळी आरोस सरपंच शंकर नाईक, आरोस तंटामुक्ती अध्यक्ष राजन नाईक, दांडेली माजी सरपंच संजू पांगम, स्मिता मोरजकर, शाखाप्रमुख तानाजी खोत, मळेवाड कोंडुरे ग्रा.पं.सदस्य अर्जुन मुळीक, रामचंद्र ऊर्फ बाबलो नाईक, विजू नाईक, मोहन नाईक, अजित कासले, संतोष नाईक, गजानन नाईक, दत्ताराम नाईक, सिद्धेश नाईक, दादा आरोलकर, बाळा शिरोडकर, आबा माणगावकर, भाई देऊलकर, बाबी परब, विनोद ठाकूर, रमेश आरोलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सोसायटी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनेकांनी महत्वाची भूमिका पार पाडली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + fourteen =