You are currently viewing संगीत

संगीत

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमराणी यांची अप्रतिम काव्यरचना

ओढुनि चाबकाचे फटकारे
फटकारे जीवघेणे साहतांना
साहतांना साबतीचे गळफास
गळफास गळा फास वाहतांना

वाहतांना भार जू गाडी गाडा
गाडा जन्मां मुकपणे गिळतांना
गिळतांना वेदना फटकारे असह्य
असह्य दुःख चक्र ते चिरफाडतांना

चिरफाडतांना माणूसकी यातनांची
यातनांची होळी अंग अंग पेटतांना
पेटतांना उडतात रक्त फवारे ऐसे
ऐसे भिजतो, थकतो, थिजतो पळतांना

पळतांना माणुसकी हरवेल्या यात्रेत
यात्रेत हौस, करमणुक, ती मौज मजा
मौजमजा फेसाळेल्या वेसनीत रक्तधार
रक्तधार डोळा पाहे बक्षिसढाल सजा

सजा भोगता माखतो गुलाल अंगभर
अंगभर वेदना झेलीत पहातो नाच
नाच हास्य प्रतिष्ठा नाचणारे झेंडे
झेंडे नाचवणारे बेधुंद टोचते काच

काच मनात ठेऊन सजतो बेंदरात
बेंदरात अंगभर नक्षी शिक्के रंगीत
रंगीत तालमीत नाचतात सोंगे घेऊन
घेऊन मला सोबत ऐकवतात संगीत

© मुबारक उमराणी
राजर्षी शाहू काॅलनी
शामरावनगर, सांगली
मो.९७६६०८१०९७.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 17 =