You are currently viewing डेगवे येथील जि.प.प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना श्री उल्हास देसाई परीवारातर्फे विविध पारितोषिके

डेगवे येथील जि.प.प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना श्री उल्हास देसाई परीवारातर्फे विविध पारितोषिके

बांदा

सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावच्या ज्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस तथा ग्रंथमित्र श्री उल्हास बाबाजी देसाई आणि बंधू परीवारातर्फे माध्यमिक विद्यालय,डेगवे या शाळेती इयत्ता ५ वी ते १० वीच्या पहिल्या क्रमांकाने उतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी पारितोषिके देण्यासाठी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई या संस्थेकडे रुपये १०,०००/-ची देणगी देऊन समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
तसेच जि.प.प्राथमिक शाळा डेगवे नं.१ या शाळेतील इयत्ता १ ली ते ४थीच्या शाळेतील सावित्रीबाई फुले दत्तक योजनेखाली प्रत्येकी एका गरीब विद्यार्थ्यां करीता रुपये ३,०००/-ची कायमस्वरूपी रक्कम मुख्याध्यापकाकडे दिली आहे.त्या देणगीच्या व्याजातून सदर एका गरीब विद्यार्थ्थाची शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.


शिवाय जि.प.प्राथमिक शाळा आंबेखणवाडीच्या इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी पारीतोषिके गेली कित्येक वर्षे दिली जातात.
सदर देणगीच्या प्रतिवर्षी येणाऱ्या व्याजातून त्यांनी आपले आजोबा स्व.भानु बाबलो देसाई व आजी स्व.सौ.सुंदराबाई भानु देसाई व वडील स्व.बाबाजी भानु देसाई व् आई स्व.सौ.सावित्रीबाई बाबाजी देसाई व मामा स्व.लाडू भिवा मळीक.यांच्या स्मरणार्थ सदर पारीतोषिके दिली आहेत.

उल्हास देसाई,
सरचिटणीस
,डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा