You are currently viewing मालवणात १३ मे रोजी “आमदार वैभव नाईक श्री” शरीर सौष्ठव स्पर्धा

मालवणात १३ मे रोजी “आमदार वैभव नाईक श्री” शरीर सौष्ठव स्पर्धा

मालवण दांडी बीच येथील पर्यटन महोत्सवात होणार स्पर्धा

आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने तसेच सिंधुरत्न कला क्रीडा मंडळ मालवण व युवक कल्याण संघ कणकवली यांच्या वतीने भव्य जिल्हास्तरीय “आमदार वैभव नाईक श्री” शरीर सौष्ठव स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे.मालवण दांडी बीच येथील पर्यटन महोत्सवात १३ मे २०२२ रोजी सायंकाळी ०५ ते १० वा.या वेळेत ही स्पर्धा संपन्न होणार आहे.
ही स्पर्धा ५५ ते ६० किलो, ६० ते ६५ किलो, ६५ ते ७० किलो, ७० ते ७५ किलो या चार वजनी गटात होणार आहे. स्पर्धा विजेत्यास रोख रु २१ हजार व आकर्षक चषक, बेस्ट पोझर साठी २ हजार व मोस्ट इम्पवृड साठी २ हजार तसेच आकर्षक चषक त्याचप्रमाणे प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकास २ हजार ५००,द्वितीय क्रमांकास २ हजार, तृतीय क्रमांकास १ हजार ५००, चतुर्थ क्रमांक १२००, पाचवा क्रमांक १००० तसेच आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
मुंबई व सिंधुदुर्ग मधील नामवंत पंच मंदार आगवणकर उमेश कोदे, किशोर सोनसुरकर, अमोल तांडेल, सुधीर हळदणकर हे स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठल्याही स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुरत्न कला क्रीडा मंडळ मालवणच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा