You are currently viewing अर्चना फाऊंडेशन तर्फे सावंतवाडी विधानसभा मतदार संघात “आधार अभियान”…

अर्चना फाऊंडेशन तर्फे सावंतवाडी विधानसभा मतदार संघात “आधार अभियान”…

शासकीय योजनांचा मिळणार मोफत लाभ…

सावंतवाडी

येथील विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात राहणारा सर्वसामान्य लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचाव्या यासाठी येथील अर्चना फाऊंडेशनच्या माध्यमातून “आधार अभियाना”चे आयोजन करण्यात आले. या अभिनयाचा शुभारंभ आजपासून दोडामार्गातून होत आहे. यात शासनाच्या पंतप्रधान सुरक्षा योजना, आयुष्यमान भारत योजना, श्रम कार्ड योजना, सुकन्या समृद्धी, नवीन आधार कार्ड काढणे-दुरुस्ती करणे, नवीन मतदार ओळखपत्र काढणे-दुरुस्ती करणे, पॅन कार्ड काढणे-दुरुस्ती करणे अशा योजना मोफत दिले जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे यांनी केले आहे.

या अभियानांतर्गत सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुक्यामध्ये मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहे. ११ ते १५ मे या काळात दोडामार्ग, १६ ते २२ आणि २३ ते ३१ या काळात सावंतवाडीत हे कॅम्प लावण्यात येणार आहेत, असे आवाहन अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा