You are currently viewing सावंतवाडी पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांच्या वाढदिवसानिमित्त युवती राष्ट्रवादीच्या वतीने सन्मान

सावंतवाडी पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांच्या वाढदिवसानिमित्त युवती राष्ट्रवादीच्या वतीने सन्मान

सावंतवाडी:

युवती राष्ट्रवादीच्या माध्यमातून कर्तबगार युवतींचा सन्मान हा राष्ट्रवादीच्या माध्यमातून होतच असतो. संसद रत्न सुप्रिया  सुळे, प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांच्या संकल्पनेतून अशा विविध कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना – घारे परब यांच्या मार्गदर्शनात सुद्धा विविध कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. यामधीलच एक भाग म्हणून सावंतवाडी पोलीस स्टेशन मधील कर्तव्यदक्ष महिला पोलीस निरीक्षक सौ. स्वाती यादव यांचा राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे रुजू झाल्यापासूनच सावंतवाडी शहरच नव्हे तर सावंतवाडी तालुक्यातील संपूर्ण युवतींना दिलासा मिळाला. प्रसंगानुरूप कडक तर तितकच सामंजस्यने वागणाऱ्या या लेडी सिंघम मुळे संपूर्ण युवाई वर्गावर होणाऱ्या अत्याचारांवर अंकुश लागला. सावंतवाडी शहरातील महाविद्यालय युवतींवरील आणि युवा वर्गातील होणाऱ्या गुन्ह्यांवर आळा घालण्याचे काम यांनी चांगलेच पद्धतीने पार पाडले.

याप्रसंगी सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, व्यापार उद्योग जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, रत्नागिरी पक्षनिरीक्षक दर्शना बाबर देसाई, सावंतवाडी शहर महिला अध्यक्ष सायली दुभाषी, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, उद्योग व व्यापार तालुका उपाध्यक्ष याकूब शेख तसेच सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रा. सचिन पाटकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =