You are currently viewing सावंतवाडीतील आरटीओ कॅम्प आता पुन्हा जिमखाना मैदान परिसरातील जागेत सुरू होणार – सुधीर आडीवरेकर 

सावंतवाडीतील आरटीओ कॅम्प आता पुन्हा जिमखाना मैदान परिसरातील जागेत सुरू होणार – सुधीर आडीवरेकर 

आमदार नितेश राणेंच्या प्रयत्नामुळे मागणीला यश…

सावंतवाडी

जागेअभावी बंद असलेला आरटीओ कॅम्प अखरे जिमखाना येथील पार्किंगच्या जागेत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने जागा देण्याचे मान्य केले आहे. यासाठी आमदार नितेश राणे यांनी प्रयत्न केले, असा दावा सावंतवाडी पालिकेचे माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांनी केला आहे.

१८ मे व १५ जुनला सावंतवाडी येथील जिमखाना मैदानाच्या समोरील पार्किंगच्या जागेत हे कॅम्प होणार आहे. यासाठी आवश्यक असलेली जागा पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी उपलब्ध करुन दिली आहे, असे श्री. आडीवरेकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा