You are currently viewing सामंत चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने सावंतवाडीत सहा जणांना आर्थिक मदत…

सामंत चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने सावंतवाडीत सहा जणांना आर्थिक मदत…

सावंतवाडी

मुंबईतील कै.दिनकर सामंत चॅरीटेबल ट्रस्ट यांच्यावतीने सावंतवाडी तालुक्यातील सहा जणांना आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ.जयेंद्र परुळेकर यांच्या माध्यमातून ही मदत देण्यात आली.

यावेळी करीना शेट्ये, रुची वालावलकर,व्यंकू पांगुळ,माधवी परब,यशवंत जाधव,बाळकृष्ण मार्गी आदींना धनादेश वाटप करण्यात आले.

कै. दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील गरजू रुग्ण व आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना मदत केली जाते. प्रतिवर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील ट्रस्ट च्या माध्यमातून ६ गरजूंना आर्थिक मदत करण्यात आली. यात एक गरजू विद्यार्थिनी तर ५ आजाराने त्रस्त रुग्णांचा समावेश आहे. यापुढेही गरजूंना आर्थिक मदतीचे कार्य सुरु राहणार असून गरजूंनी योग्य ती कागदपत्रे येथील डॉ परुळेकर यांच्या आनंद पॉलिक्लिनिक येथे सादर करण्याचे आवाहन डॉ परुळेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा