You are currently viewing अस्तित्व

अस्तित्व

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच….. लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य कवी लेखक दीपक पटेकर यांची अप्रतिम काव्यरचना

फुल होउनी फुलतो दवबिंदू बनुनी चमकतो
अस्तित्व तुझे देवा तू पाना फुलांत दाखवतो

मंद पहाट वाऱ्यात तू स्पर्श उबदार करतो
ऊन कोवळे सोनेरी अंगोपांगी देऊनी हसतो

कंठातुनी कोकिळेच्या स्वर मंजुळ ऐकू येतो
भजनात टाळ मृदंग नाद भक्तीचाच बोलतो

कठोर खडकातुनी झुळझुळ निर्झर पाझरतो
लाही लाही होताची तू धारा होउनी बरसतो

अंधाऱ्या रात्रीत काजवा मंद उजेड दावतो
भीती सरते मनातली अन् तुझाच भास होतो

(दीपि)
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा