You are currently viewing इचलकरंजीत माकपची केंद्र सरकारच्या निषेधार्थ निदर्शने

इचलकरंजीत माकपची केंद्र सरकारच्या निषेधार्थ निदर्शने

गॅस दर कमी करण्याची मागणी ; प्रांत कार्यालयास निवेदन सादर

इचलकरंजी / प्रतिनिधी

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये ५० रुपयांची वाढ करुन सर्वसामान्य जनतेची क्रूर थट्टा चालवली आहे.याच्या निषेधार्थ आज इचलकरंजी येथे माकपच्या वतीने मलाबादे चौकात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.तसेच गॅस दर कमी करुन सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याची मागत करत त्या संदर्भात प्रांत कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.

गेल्या दोन वर्षात कोरोना महामारी व लाॅकडाऊनमुळे रोजगार बुडून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.परिणामी , आर्थिक नियोजन कोलमडून विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.त्यात आता
केंद्र सरकारने पेट्रोल – डिझेल व गॅस सिलिंडरच्या दरामध्ये वाढ करण्याचा सपाटाच लावला आहे.नुकताच सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये ५० रुपयांची वाढ करुन सर्वसामान्य जनतेची क्रूर थट्टा चालवली आहे.याच्या निषेधार्थ आज इचलकरंजी येथे माकपच्या वतीने मलाबादे चौकात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केंद्र सरकारने अच्छे दिन आणण्यासाठी आपल्या चुकीच्या धोरणांमध्ये सुधारणा करुन गॅस सिलिंडरच्या दरातील वाढ कमी करुन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा ,अशी मागणी केली.याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला.
यावेळी सदर मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने प्रांत कार्यालयात शिरस्तेदार संजय काटकर यांच्याकडे सादर करण्यात आले.या आंदोलनात कामगार नेते दत्ता माने ,शिवगोंडा खोत ,ए.बी.पाटील , भाऊसाहेब कसबे ,नूरमहंमद बेळकुडे ,आनंद चव्हाण ,धनाजी जाधव , सुभाष कांबळे , पार्वती जाधव ,संजय टेके ,वत्सला भोसले यांच्यासह पदाधिकारी , सदस्य सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − 2 =