You are currently viewing शिवडाव बौद्धवाडीतील साकव चोरीला…

शिवडाव बौद्धवाडीतील साकव चोरीला…

कणकवली :

कणकवली तालुक्यातील शिवडाव बौध्दवाडीतील साकव चोरीला गेला आहे. एकंदरीत चौकशी करता शिवडाव बौद्धवाडीतील साकव विशेष घटक योजनेतून ३०लाखाचा मंजूर झाला होता. परंतु सर्वत्र शोधाशोध करता तो साकव शिवडवमधील गावकर वाडी येथे बांधकाम चालू अवस्थेत दिसून आला आहे.

एकूण माहितीवरून असे समजते की,  जिल्हा परिषदेतील विशेष घटक योजनेतून नामांकित लोक्रतिनिधींच्या मतदार संघात ही वस्तुस्थिती आहे. बौध्द वाडीतील साकव गावकर वाडीत नेण्यामागे विशेष वजन त्यांनी खरची घातले आहे. माननीय पालकमंत्री व खासदार साहेबांनी यावर तक्रार नोंदवून सुध्दा जि. प.मुजोर अधिकारी व लोक्रतिनिधीं यांची मिलीभगत असल्याने काहीही कारवाई होत नाही. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्री महिंद्र सावंत यांनी ग्रामविकास मंत्र्याकडे लेखी कळवून दाद मागायची ठरविले आहे, अशी माहिती श्री महिंद्र सावंत जिल्हा सरचिटणीस काँग्रेस यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 6 =