You are currently viewing सिंधुदुर्गातील पाच पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या

सिंधुदुर्गातील पाच पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या

सिंधुनगरी

पोलीस निरीक्षक दर्जाच्या जिल्ह्यातील पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्हा अंतर्गत करण्यात आल्या आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी या बदल्या केल्या आहेत. बदल्या झालेल्यांमध्ये वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल माधवराव जाधव यांची वेंगुर्ले पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. येथील पोलीस निरीक्षक तानाजीराव मोरे हे 31 मे रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यांच्या रिक्त झालेल्या जागी विनंतीनुसार जाधव यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

ओरोस येथील पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले मात्र दोडामार्ग पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस अधिकाऱ्याचा पदभार सांभाळणारे अशोक भोसले यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग येथे विनंतीवरून बदली झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांची वैभववाडी पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांचीदोडामार्ग पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिस निरीक्षक विजय यादव यांची मालवण पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदी बदली झाली आहे. मालवणची पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर हे31 मे रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या रिक्त जागी यादव यांची बदली झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा