You are currently viewing आचिर्णे नजीक रेल्वे ट्रॅकवर आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह 

आचिर्णे नजीक रेल्वे ट्रॅकवर आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह 

वैभववाडी

आचिर्णे नजीक रेल्वे ट्रॅक वर अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. रेल्वेच्या धडकेत या महिलेचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.
वैभववाडी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव, उपनिरीक्षक सुरज पाटील, पोलीस कर्मचारी अभिजीत तावडे, श्री पवार, सौ. शिंगाडे मॅडम, संदीप राठोड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. सदर महिलेची ओळख पटवण्यासाठी इतर तालुक्यातील पोलिस ठाण्यात तसेच पोलिस पाटील यांच्याशी वैभववाडी पोलीस संपर्क साधत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + one =