You are currently viewing माय

माय

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी निवृत्त पोलिस अधिकारी वासुदेवराव खोपडे यांची अप्रतिम काव्यरचना

हाक मायले मारता
वाहये डोयातून पाणी
माय मायेची मूर्ती
देवा बनविली कोणी ?

असे माय चंद्रभागा
माय वीठाईं माऊली
असे चंद्राहुनी शीतल
तिच्या मायेची साउली !

माय पूर्ण ब्रम्ह
माय गुरुचा अवतार
माय पूर्ण माया
जीवा शिवाचा आधार !

वर आभाय आभाय
नसे रे त्याले अंत
मन मायच विशाल
माया ममता अनंत !

माझी माय आदिशक्ति
तिची अमृताची वाणी
होती दिशा दाही धूंद
ऐकुन अंगाईची गाणी !

अशी आमुची माय
अन्नपूर्णा जगत माता
पोटी मांगती रे जन्म
कोटि तेहतीस देवता !

जन्मोजन्मी मिळो हीच माय
माही हीच देवाले मागणी
माय मायेची मुर्ती
कशी बनविली कोणी ?

वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलिस उपनिरीक्षक(सेनी)
अकोला9923488556

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − four =