You are currently viewing आमचे पुढारी

आमचे पुढारी

*कोकण मराठी साहित्य परिषद, तालुकाध्यक्ष शाखा मालवण लेखक कवी श्री सुरेश ठाकूर गुरुजी लिखित “मतदाराची भळभळती जखम” मालवणी काव्यरचना*

*आमचे पुढारी*
(एका मालवणी मतदाराची भळभळती जखम)

पुढाऱ्यांनी आमच्या हाली लयच केल्यानी,
कमरेचा सोडून चक्क टकलेक गुंडाळल्यानी //धृ.//

दावो काय! प्रतिदावो काय?
टोलो काय! प्रतिटोलो काय! विकासाच्या कामापरीस,
शिमग्यारच जोर धरल्यानी
पुढाऱ्यांनी आमच्या हाली लयच केल्यानी,
कमरेचा सोडून चक्क टकलेक गुंडाळल्यानी //१//

हेंच्या मुळा आमका, टीव्ही बघूक नको!
पेपराचा खयचाव पान उघडूक नको!
पानां पानांर हेंचेच गाळी!
रोजच चलता हेंची होळी!
मतदारांका तेनी शेणारच काढल्यानी,
पुढाऱ्यांनी आमच्या हाली लयच केल्यानी,
कमरेचा सोडून चक्क टकलेक गुंडाळल्यानी //२//

मत मागाक येताना मान खाली घालून इले!
पायाचा सोडाच, जुत्याकव नमस्कार करून गेले!
तुमचो इकास आमच्या हातात!
पोरांची नोकरी मा? भियातस खेका?
सगळी वचना खळ्यातच देवन गेले,
शेवटाक टाळुवयला लोणीव नाय शिल्लक ठेयल्यानी,
पुढाऱ्यांनी आमच्या हाली लयच केल्यानी,
कमरेचा सोडून चक्क टकलेक गुंडाळल्यानी //३//

पाच वर्सा एवढे चरले
शेरडांका वाटली लाज
खा खा एवढा खाल्ल्यानी,
बकासुरान शेवटाक जोडले हात.
इडयेक भियान पक्ष सोडल्यानी,
बावडेतल्या बेडकांनीव माने खाली घातल्यानी
हेंच्या इठ्ठलाक बडव्यांनी आताच कसो घेरल्यानी
पुढाऱ्यांनी आमच्या हाली लयच केल्यानी,
कमरेचा सोडून चक्क टकलेक गुंडाळल्यानी //४//

निवडणूक लागली की घरांकडे येतत
हेंका येवक जमला नाय तर कार्यकर्त्याक धाडतत
नानांचो, नाथांचो वारसो सांगतत
तसाच काम करतलव म्हणून शब्द देवन जातत
सगळ्याच पक्षानी, सगळ्या पुढार्‍यानी
भारताच्या घटनेक मान खाली घालूक लावल्यानी,
पुढाऱ्यांनी आमच्या हाली लयच केल्यानी,
कमरेचा सोडून चक्क टकलेक गुंडाळल्यानी //५//

आता मत मागाक आमच्या खळ्यात तुमी यायचा नाय
सारयलेला खळा आमचा बाटवचो तुमका अधिकार नाय
पूर्वीचे दिवस गेले, आता तुमचा खरा नाय
आखाड्यात आमच्या दांडे आसतत,
ह्या कधीच तुम्ही इसरायचा नाय.
अरे! मनाची सोडा, जनाची हेनी लाजच सोडल्यानी
पुढाऱ्यांनी आमच्या हाली लयच केल्यानी,
कमरेचा सोडून चक्क टकलेक गुंडाळल्यानी //६//

— *सुरेश शामराव ठाकूर* उर्फ
*ठाकूर गुरुजी, आचरे पारवाडी.*
*फोन नं. ९४२१२६३६६५*

*संवाद मीडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

संपर्क:
*9145623747 / 9420156771 / 7887561247*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/101911/
————————————————

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + eighteen =