You are currently viewing राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थ्यांना ५ लाख ८० हजार रुपये अनुदानाचे धनादेश वाटप

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थ्यांना ५ लाख ८० हजार रुपये अनुदानाचे धनादेश वाटप

इचलकरंजी

राज्यातील महाविकास आघाडी शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजने अंतर्गत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील
इचलकरंजी परिसरातील २९ लाभार्थ्यांना ५ लाख ८०
हजार रुपये इतक्या अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आले. इचलकरंजी शहर संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राहुल खंजिरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कर्त्या स्त्री पुरूषाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास शासनाच्या वतीने २० हजार रुपये देण्यात येतात. इचलकरंजी शहर व परिसरातील २९ लाभार्थ्यांचे माहे मार्च,एप्रिलपासून अनुदान मागणी होती. सदर अनुदान प्राप्त करण्याकरिता पालकमंत्री सतेज पाटील,नामदार हसन मुश्रीफ,नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर,खा.धैर्यशील माने,तसेच तहसीलदार शरद पाटील यांचे सहकार्य लाभले.याबाबतची माहिती संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राहुल खंजिरे यांनी दिली.
यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य हारुण खलिफा, राजन मुठाणे , नागेश शेजाळे, सचिन कांबळे, सुरज लाड,सुदाम साळुंखे,अजित मिणेकर, बाबासो कोतवाल, सौ.सरिता आवळे तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा