You are currently viewing उद्योगाचे ज्ञान आत्मसात करा – नारायण राणे

उद्योगाचे ज्ञान आत्मसात करा – नारायण राणे

वेंगुर्ला

निसर्गसंपन्न अशा वेंगुर्ल्यात नगराध्यक्ष गिरप यांनी त्यांच्या सहका-यांनी बांधलेल्या या उत्कृष्ट इमारतींची भर पडली आहे. वेंगुर्ला शहरासारखा विकास इतर कुठेच पाहिला नाही. विकास हाच आमचा मुद्दा आहे. आमच्याचंच आम्ही कौतुक करीत नाही तर आम्ही काम आणि कार्याने बोलतो. भविष्यात जिल्ह्यात विविध फॅक्ट-या येणार आहेत. त्यामुळे इथल्या सर्वांनी उद्योगाचे ज्ञान आत्मसात करा असे आवाहन वेंगुर्ल्यातील बहुउद्देशीय सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले. भाजपाचे लोकप्रतिनिधी कसे असतात हे सांगताना आपण गिरप यांनी केलेल्या या विकासाचा उल्लेख करणार असल्याचेही श्री. राणे यांनी सांगितले. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कॅम्प येथे बांधलेल्या नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृहाचा लोकार्पण कार्यक्रम नारायण राणे यच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत, माजी राज्यमंत्री रविद्र चव्हाण, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, नगरसेवक सुहास गवंडळकर, महेश डिचोलकर, विधाता सावंत, प्रशांत आपटे, दादा सोकटे, धर्मराज कांबळी, अस्मिता राऊळ, पूनम जाधव, कृपा मोंडकर, साक्षी पेडणेकर, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, श्रेया मयेकर, शैलेश गावडे, नागेश गावडे, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, भाजप प्रदेश कार्यालयीन सहसचिव शरद चव्हाण आदी उपस्थित होते.

वेंगुर्ल्यातील विकास कामांमध्ये मला खारीचा वाटा उचलता आला. याचा मला आनंद आहे. आज सेना-भाजपाच्या मंत्र्यांकडून गिरप यांनी वेंगुर्ल्यात विकासासाठी निधी आणला. त्यामुळे गिरप यांचा नक्की पक्ष कोणता? असे पालकमंत्री सामंत यांनी सांगत विकास करणे हाच माझा पक्ष असे गिरप यांचे मत असल्याने शहराचा विकास करणे त्यांना झाले. यापुढे या नगरपरिषदेमध्ये राजकारण विरहित विकास केला जाईल असा शब्द देताना वैशिष्ट्यपूर्ण निधीतून २ कोटी रुपयांचा निधी पुढील काळात वेंगुर्ला नगरपरिषदेला देणार अससल्याचे पालकमंत्री यांनी यावेळी जाहिर केले. तर स्वच्छतेच्या बाबतीत वेंगुर्ल्याचा कायापालट करणा-या तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांचेही त्यांनी कौतुक केले. पाच वर्षापूर्वी जनतेला जी आश्वासने देत होतो ती आज पूर्ण झाली याचा मोठा आनंद आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या एकत्रित काम करण्याचा हा प्रत्यस असून नागरिकांनीही यासाठी मोठी साथ दिली आहे. मिळालेल्या पैशाचे सोने कसे करायचे हे या नगरपरिषदेने दाखवून दिले. येणा-या काळात हे सर्व टिकविणे सर्वांची जबाबदारी असल्याचे रविद्र चव्हाण म्हणाले.

वेंगुर्ला शहरातील वेगवेगळ्या विकास कामांसाठी आपल्याला निधी उपलब्ध करुन देता आला हे मी माझे भाग्य समजतो. वेंगुर्ला शहराला जगाच्या नकाशावर आणायचे आहे. त्यासाठी आपापसातील मतभेद दूर सारून केवळ विकासासाठीच एकत्र काम करायचे असल्याचे दीपक केसरकर यांनी ऑनलाईन उपस्थित राहून सांगितले. यावेळी मान्यवरांसोबतच बहुउद्देशीय सभागृह बांधण्यासाठी सहकार्य लाभलेल्या अमित कामत, ए.एस.जुवेकर, विनीत पांगम, राकेश पवार, श्री. गुरव, सिद्धेश नाईक, राजेंद्र पोळ, श्रीकांत पाटील, उदय पाटील, स्वप्निल परब, अमरजीत आमले, मारुती दोडशानट्टी, अतुल शिरोडकर, स्वच्छता दूत सुनिल नांदोसकर यांचा सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी प्रास्ताविक, काका सावंत यांनी सूत्रसंचालन तर नगरसेवक प्रशांत आपटे यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − eight =