You are currently viewing साटेली – भेडशी तंटामुक्ती अध्यक्ष महेश (पिंट्या) धर्णे यांचे निधन

साटेली – भेडशी तंटामुक्ती अध्यक्ष महेश (पिंट्या) धर्णे यांचे निधन

दोडामार्ग

साटेली – भेडशी तंटामुक्ती अध्यक्ष महेश (पिंट्या) गुरुदास धर्णे (42) यांचे शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुलगे, आई, भाऊ,विवाहित बहिणी असा परिवार आहे.
महेश धर्णे हे भाजपा पदाधिकारी तसेच साटेली भेडशी शक्तिकेंदप्रमुख म्हणून जबाबदारी होती केंद्रीय मंत्री नारायण राणे समर्थक म्हणूनही त्यांची ओळख होती त्याच बरोबर ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही ते निवडून आले होते. तर सद्या साटेली भेडशी तंटामुक्ती अध्यक्ष होते. गावातील प्रत्येक सामाजिक ,सांस्कृतिक कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग असायचा.गावातील मुलांना क्रिकेट खेळ खेळण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी स्वतः पुढाकार घेऊन क्रिकेट स्पर्धा आयोजन करीत. शनिवारी सकाळी त्यांची तब्येत बिघडल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले त्यावेळी त्यांचे उपचारादरम्यान निधन आले.यावेळी ग्रामस्थ ,सामाजिक कार्यकर्ते ,राजकीय पदाधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी केली होती.
त्यांच्या अकाली निधनाने साटेली भेडशी ग्रामस्थांसह परिसरातील नागरिक ,राजकीय पदाधिकारी ,क्रिकेट खेळाडू यांनी शोक व्यक्त केला.शनिवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − two =