You are currently viewing “वेगळं व्हायचंय मला”

“वेगळं व्हायचंय मला”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ जयश्री कुलकर्णी यांचा अप्रतिम लेख*

*”वेगळं व्हायचंय मला”*

मध्यंतरीच्या काळात स्त्री शिक्षणापासून वंचित राहिली. पर्यायाने, परावलंबी होऊन जगत राहिली. तिचे स्वातंत्र्य ,आत्मविश्वास, संपला होता. पण” दाबलेला चेंडू जसा उफाळून जास्त ऊंच जातो, तशीच स्त्री आता सक्षम झाली आहे. पायावर उभी राहिली आहे .आणि आत्माभिमान जागा झाला आहे तिचा. आजच्या या मुलींना पाहिलं की खरंच खूप छान वाटतं. पण यातून अनेक प्रश्नही निर्माण झाले .ते पाहिलं की वाटतं मग ,शिक्षण, त्यानंतरचं स्वावलम्बन ,आत्मविश्वास, स्व निर्भरता ,याला चांगलं म्हणावं की वाईट ?
आपल्या भारतातली कुटुंब व्यवस्था कुटुंब संस्था इतकी सुंदर आहे की, परके देश या सगळ्यांकडे कुतूहलाने पाहतात .हे कुटुंब, हा गोतावळा, एकमेकांना धरून असणे, त्यातून आलेले संस्कार ,आपुलकी, प्रेम हे भारताचं फार मोठं वैभव आहे. माणूस माणसाला धरून राहिला, आणि घर निर्माण झालं .हे घर म्हणजे नुसत्या चार भिंती नव्हेत ,तर त्या भिंतींच्या आत असलेलै जिव्हाळ्याचे संबंध .सुख दुःख वाटून घेणं, एकमेकांशी जवळीक साधणं.
पण या सगळ्याला दृष्ट लागू पाहत आहे. शिक्षणामुळे या कुटुंब संस्थेला सुरुंग लागू पाहतोय. कारण आधी मुळात लवकर लग्न होत नाहीत .आणि झाल्यावर ही टिकतील की नाही ही काळजी वाटायला लागली आहे ,मुलींपेक्षा मुलांच्या आई-वडिलांना .कबूल आहे मुलगी परक्या घरातून येते. दोन घरांचे संस्कार वेगवेगळे असतात. ॲडजस्टमेंट ला वेळ लागतोच, पण हल्ली मुलींना कमावत्या असल्याने, त्यांना ऍडजेस्ट करण्याची गरजच वाटत नाही. विवाहापूर्वी त्या अटी घालू लागल्या आहेत. त्यातही प्रामुख्याने अट असते ,”आय वॉन्ट माय स्पेस” स्वातंत्र्य हवं असतं त्यांना! आणि ते कुठपर्यंत ,तर घरात माणसेच नकोत.पर्यायाने ,”वेगळं व्हायचंय मला “मी आणि माझा नवरा! कुठेतरी वाचण्यात आलं की सासू-सासरे म्हणे” डस्टबिन “असतात .ते नकोतच घरात. अरे हा रेडीमेड मुलगा आभाळातून पडला कां? त्याला इथ पर्यंत आणण्यात, आई-वडिलांचं रक्त आटून गेलेलं असतं. थकलेल्या वयात त्यांना आधार नको? कोण सांभाळेल त्यांना? पण,” वेगळं व्हायचंय मला” या वृत्तीमुळे वृद्धाश्रम वाढतायत. भारताच्या संस्कृतीला वृद्धाश्रम हे लांछनास्पद आहे .अहो ,पूर्वी एकत्र कुटुंबात ,वीस-पंचवीस माणसं राहायची. त्यात लांबलांबच्या नात्यातली अनाथ लोकसुद्धा सांभाळली जायची .शिक्षणासाठी कुणी असायचं त्या कुटुंबामध्ये .जावा जावा यांची सगळी मुलं एकत्र मोठी होत. कोण कुठे खेळतोय ?कोणी जेवला का नाही ?आई पेक्षा ही आज्यांचं लक्ष असायचं लेकरांवर! त्यातूनच आज आपण या नात्यातला जिव्हाळा पाहतो. घर म्हणजे गोकुळ असायचं. कबूल आहे स्त्रीचं विश्व आजघर ,माजघर येवढच असायचं. पण कोणाला पाळणाघर, वृद्धाश्रमात टाकायची वेळ नव्हती येत .नव्हे, ते अस्तित्वातच नव्हते. आणि ते घरातून मिळालेलं प्रेम, वात्सल्य ,तरुणांना शरीराने तर नक्कीच, पण मनाने ही सुदृढ बनवत होते .म्हणून आजच्या सारखे पंधराव्या वर्षी कुणी आत्महत्या केल्याचं ऐकु नाही आलं तेव्हा!
मनाने सुदृढ असल्याने ,क्रांतिकारक सुद्धा निर्माण झाले .काहीतरी ध्येय घेऊन फासावर चढायला ही कचरले नाहीत ते !आणि आजचे तरुण,हे असे कां घाबरलेले? व्यसनाधीन, मोबाईलच्या स्क्रीन च्या ताब्यात गेलेले ,सतत चिंताग्रस्त असलेले. “लाथ मारीन तिथे पाणी काढीन” ही प्रवृत्ती आज का संपत चालली आहे? याचं एकच कारण ,कुटुंब नाही! पाठीवरुन फिरणारा हात नाही. चूक झाल्यानंतर “मी आहे “असं म्हणून, सांभाळून घेऊन ,दिशा दाखवणारा कोणी नाही .या मुलींनी वेगळं व्हायचंय मला म्हणताना, विचार करायला हवा ,की मी आज माझ्या पायापुरत पाहिलं ,तर उद्याची तरुण पिढी सशक्त बनेल का ?यासाठी कुटुंबाची आवश्यकता आहे. घरात वडीलधारी माणसं ,प्रसंगी रागावणारी ,प्रसंगी धीर देणारी हवी असतात. तुम्ही दोघं कामानिमित्ताने बाहेर राहाल ,पण मुलांना आल्यानंतर ,”गरम थालीपीठ” लावून देणारी आजी हवी ,आजोबा हवेत. त्या मुलांच्या वडिलांनाही ,आधार हवा .कारण बाह्य परिस्थितीमुळे आतून पिचून गेलेल्या माणसाला, मोडून पडायला फुंकरही पुरेशी होते.

आणि आता पूर्वीसारखा सासुरवास तरी कुठे राहिला आहे? पूर्वीसारखी धबडक्याची काम कुठे राहिली आहेत? सासूलाही कळत ना की सुन दमून आली आहे ,तिला विश्रांती हवी.
फार मोठा आधार असतो हा वृद्ध माणसांचा. घरात लहान मूल आजारी असते, तर ती एकटी स्त्री काय करेल? अनुभवांनी समृद्ध असलेली ही मागची पिढी तुम्हाला खूप समजून घेते आता. नव्हे, तुम्हाला तुमची स्पेस ही देते .मग का अडचण होते त्यांची? अखेर पैशाला काय महत्त्व आहे ?जर मनच खंबीर नसेल ,आणि ते एकत्र कु
टुंबाने होत असेल, तर बायांनो हट्ट सोडा,” वेगळ व्हायचं मला “समजून घ्या ना त्यां संस्काराला, आणि कुटुंब व्यवस्थेला .मग पुढची वाटचाल सुखकर होईल .नक्कीच!

जयश्री जिवाजी कुलकर्णी
नाशिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − twelve =