You are currently viewing कास नं .१ शाळेचा शताब्दी सांगता समारोह महोत्सव ७ व ८ मे ला

कास नं .१ शाळेचा शताब्दी सांगता समारोह महोत्सव ७ व ८ मे ला

बांदा

स्वातंत्र्यपूर्व काळात १९२२ मध्ये स्थापना झालेल्या सावंतवाडी तालुक्यातील कास नं .१ शाळेचा शतक महोत्सवाचा सांगता समारोहाचा कार्यक्रम शनिवार दि. ७ मे व रविवार दि .८मे २०२२या दोन दिवसात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे
७ मे रोजी सभामंडप उद्घाटन,स्मरणिका प्रकाशन, विद्यार्थ्यांचा गुणगौरव ,शैक्षणिक साहित्य प्रदर्शन तसेच या दिवशी दुपारी स्नेहभोजन व संध्याकाळी ६वाजता संगीत संध्या रजनी ,
७ वाजता देणगीदारांचा सत्कार व रात्री शालेय विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम तर माजी विद्यार्थ्यांचा शापित गंधर्व हा दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे .
८मे रोजी सायंकाळी ५ वाजता शतक महोत्सवाची सांगता १००फुगे उडवून करण्यात करण्यात येणार यावेळी देणगीदारांचा सत्कार करण्यात येणार असून रात्री माजी विद्यार्थी व पालक यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम व त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचे भिमाशंकर महात्म्य हे दशावतारी नाटक सादरीकरण होणार आहे.
या महोत्सवात इतिहासकालीन नाणी व नोटा यांचे प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहे. या महोत्सवात सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याध्यापक ,शिक्षकवृंद ,पालक ,विद्यार्थी,शाळा व्यवस्थापन समिती,पालक -शिक्षक संघ,माता-पालक संघ शतक महोत्सव समिती व उपसमिती व कास ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा