You are currently viewing सह्याद्री पट्ट्यात शुक्रवारी चक्रीवादळ

सह्याद्री पट्ट्यात शुक्रवारी चक्रीवादळ

शेत मांगर आणि छप्परांचे पत्रे उडाले

सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यात सह्याद्री पट्ट्यात शुक्रवारी चक्रीवादळ झाले. तब्बल पंधरा मिनिटं अधिक काळ वादळी पाऊस झाला. कलंबिस्त पंचक्रोशीत या चक्रीवादळाने शेत मांगरांचे पत्रे व छप्पर उडून गेले. तसेच छोटी झाडे मोडून पडली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास हे वादळ झाले. कलंबिस्त, वेर्ले, शिरशिंगे, सांगेली, सावरवाड आदी भागात वादळाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. कलंबिस्त धामणमळा येथे शंकर सावंत यांच्या शेतात मांगराच्या छप्पराचे पत्रे उडून गेले व मोठे नुकसान झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + eighteen =