You are currently viewing बिळवस येथे मोटारसायकल – लक्झरी बस यांच्यात भीषण अपघात

बिळवस येथे मोटारसायकल – लक्झरी बस यांच्यात भीषण अपघात

मोटारसायकलवरील दोघे युवक गंभीर जखमी

मालवण

आंगणेवाडी होऊन महानकडे जात असणाऱ्या मोटर सायकल आणि मालवणहून बागायतकडे जाणाऱ्या लक्झरी बस यांच्यात बिळवस येथे झालेल्या अपघातात दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. युवकांना प्राथमिक उपचारासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून अधिक उपचारासाठी दोघांनाही पडवे येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातात दत्तात्रय आंगणे आणि गजानन मराठे हे युवक गंभीर जखमी झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा