You are currently viewing मालवण भाजपची शहर भाजप कार्यालयात उद्या महत्वाची बैठक…

मालवण भाजपची शहर भाजप कार्यालयात उद्या महत्वाची बैठक…

सर्वांनी उपस्थित राहण्याचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचे आवाहन

मालवण

भारतीय जनता पार्टी शक्ती केंद्रप्रमुख, शक्ती केंद्र प्रभारी, भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, सर्व सरपंच, तालुका कार्यकारणी सदस्य, पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य, सर्व आघाडी मोर्चा पदाधिकारी यांची संयुक्त बैठक रविवार १२ मार्च सकाळी १० : ३० वाजता भाजप कार्यालय मालवण शहर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्वांनी वेळीच उपस्थित राहावे.

बैठकीत बूथ सशक्तीकरण अभियान, १७ मार्च रोजी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त होणारे कार्यक्रम. याबाबतही नियोजन होणार आहे. तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे. असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =