You are currently viewing राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची तोफ सातत्याने धडाडली पाहिजे – माजी जिल्हाध्यक्ष पी.व्ही. ठाकूर

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची तोफ सातत्याने धडाडली पाहिजे – माजी जिल्हाध्यक्ष पी.व्ही. ठाकूर

 

ओरोस :

सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची बुलंद तोफ सातत्याने धडाडली पाहिजे तरच सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न धसास लागू शकतील असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. पी.व्ही. ठाकूर यांनी आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या स्नेह मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.

सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या आजी व माजी पदाधिकाऱ्यांचा स्नेह मेळावा नुकताच ओरोस येथील राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर संघटनेचे विद्यमान कार्याध्यक्ष श्री. सत्यवान श्री.माळवे, सचिव श्री.राजन वालावलकर, माजी सरचिटणीस श्री. चंद्रशेखर उपरकर, चतुर्थश्रेणीचे राज्य सचिव श्री.सखाराम सकपाळ, कोषागार संघटनेचे अध्यक्ष श्री.राजेश चव्हाण हे उपस्थित होते.

यावेळी संघटनेसाठी सुमारे 25 वर्षे दिलेल्या योगदनाबद्दल आजीमाजी संघटना पदाधिकाऱ्ऱ्यांच्यावतीने श्री. पी.व्ही. ठाकुर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना श्री. ठाकुर म्हणाले कि, संघटनेत श्री.चंद्रशेखर उपरकर, सकपाळ, राजू तावडे, साळगांवकर, पाताड़े वगैरे जिव्हाळयाची माणसे होती. म्हणूनच आम्ही संघटनेतर्फे केलेली अनेक आंदोलने, संप,धरणे, प्रचंड मोर्चे यशस्वी करू शकलो. अनेकवेळा आलेल्या कठीण प्रसंगाना सुद्धा सामोरे जाऊ शकलो. ओरोस मुख्यालयासाठी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणयासाठी तनमन धन अर्पुन काम केले म्हणूनच संघटनेचा आवाज बुलंद होता. संघटनेचा प्रशासनावर आणि अधिकाऱ्यांवर अंकुश होता. ती प्रगलब्धता पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करा. असे आवाहनहि त्यांनी विद्यमान पदधिकाऱ्यांना केले.

श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी सांगितले की, आपण जिल्हा समन्वय समितिच्याहि सरचिटणीस पदांवर असल्याने विविध खात्यांच्या नियमांचा व कार्यपद्धतीचा अभ्यास करावा लागत होता .त्यासाठी कर्मचारी सेवानियम, कोषागार नियम, फॅक्टरी एक्ट, मोटर ट्रान्सपोर्ट एक्टआणि कामगार कायदे, ट्रेड यूनियन कायदे यांचे वाचन क्ररावे लागत होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांपुढे जाताना संबंधित प्रश्नांसाठी आपली पूर्वतयारी असणे आवश्यक असते. संघर्ष करताना तांत्रिक बाबिंची माहिती घ्यावी लागते. पदाधिकाऱ्यांत एकजूट असेल तरच लढे यशस्वी होतात. यावेळी श्री. सखाराम सपकाळ, राजू तावडे, भाऊ पाताड़े, जिव्हि साळगांवकर, सचिन माने, शाम लाखे, वग़ैरेनी आपले विचार व्यक्त केले. तसेच विद्यमान पदाधिकारी आणि राज्य कर्मचारी संघटनेचे सदस्य यांचा ऑक्टोबर मध्ये भव्य मेळावा आयोजित करण्याचे ठरविनणयात आले. तसेच दरवर्षी आजीमाजी पदाधिकाऱ्यांचा स्नेह मेळावा घेण्यात येणार आहे. सदरील बैठकीस महसूल विभागांचे श्री. संतोष खरात, जीएसटी विभागांचे श्री. सुधाकर घाडिगावकर, बीएस राणे, महेश म्हात्रे, गुणाजी तळेकर, गजानन गावड़े, नंदू सावंत, पतसंस्थेचे माजी सचिव चंद्रकांत परब, यशवंत सावंत वगैरे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − 2 =