You are currently viewing भाजपचा तळगाव सोसायटीवर विजय; शिवसेनेचा पराभव

भाजपचा तळगाव सोसायटीवर विजय; शिवसेनेचा पराभव

चेअरमन पदी प्रकाश पावसकर ; व्हाईस चेअरमन पदी राजेंद्र दळवी निवड

मालवणातील तळगाव सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणूकीत भाजपने विजय मिळवला आहे. या सोसायटीवर चेअरमन पदी प्रकाश पावसकर तर व्हाईस चेअरमन पदी राजेंद्र दळवी हे ७ विरुद्ध ६ मतांनी निवडून आले. यावेळी, भाजपच्या विजयानंतर भाजपा प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे. याबाबत ट्विट करताना २०२४ ला हा कोकणाला लागलेला कोरोना आम्ही कायमचा घालवणार, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

नुकतीच तळगाव सोसायटीची निवडणूक झाली होती. गुरुवारी या सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी चेअरमन पदी प्रकाश पावसकर तर व्हाईस चेअरमन पदी राजेंद्र दळवी हे ७ विरुद्ध ६ मतांनी निवडून आले.

यावेळी संचालक चेतन मुसळे, प्रविण जावकर, महेश परब, समृद्धी कुशे, वर्षा वाळके यांच्यासह भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी सभापती अजिंक्य पाताडे, जगदीश चव्हाण, प्रसाद मोरजकर, भाई राणे, चंद्रकात पेडणेकर, सागर कुशे, ऊमेश राणे, देऊ कदम, राजु दळवी, स्वप्निल गावडे, माधुरी बांदेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा