You are currently viewing देवगड शहराला वेळवाडीतून पाणी पुरवठा करा : तन्वी चांदोस्कर

देवगड शहराला वेळवाडीतून पाणी पुरवठा करा : तन्वी चांदोस्कर

देवगड :

देवगड – जामसंडे नगरपंचायत हद्दीमध्ये वेळ वाडी सडा येथे साडेसहा लाख लीटर क्षमतेची पाणी साठवण टाकी गेले सहा महिने बांधून पूर्ण अवस्थेत उभी आहे. सद्यस्थितीत देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीमधील महिला भगिनींना अनियमित पाणीपुरवठा व कमी दाबाने पाणी येत येते म्हणून त्रास होत आहे. तरी लवकरात लवकर वेळवाडी सडा येथील पाणी साठवण टाकी वरून देवगड जामसंडे शहराला पाणीपुरवठा चालू करावा व देवगड जामसंडे महिला वर्गाला होत असलेला त्रासातून मुक्तता करावी अशा आशयाचे निवेदन नगरसेविका सौ तन्वी चांदोसकर यांनी देवगड जामसंडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा