You are currently viewing भालावल ग्रामपंचायत नजिक जुगाराची मैफिल

भालावल ग्रामपंचायत नजिक जुगाराची मैफिल

जुगाराचे जाळे जिल्हाभर पसरले

अवैध व्यवसायांना सर्वात जास्त मार्केट जिल्ह्यात पहायला मिळत आहे. कोंडुरा येथील जुगाराच्या अड्डयांवर एलसीबी कडून धाड टाकून ५२ हजारांचा मुद्देमाल सहित नऊ जणांना ताब्यात घेतल्याची खबर ताजी असतानाच बांदा येथून जवळच असलेल्या भालावल गावाच्या ग्रामपंचायत कार्यालया शेजारी दिवस-रात्र जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली असून दिवस रात्र चालणाऱ्या भालावल येथील जुगाराच्या मैफिलीत लाखोंची उलाढाल होत आहे.
दोडामार्ग तालुक्याच्या एका बाजूला असलेला भालावल हा निसर्गरम्य गाव. शेती बाग बागायती हा मुख्य व्यवसाय असलेल्या गावात खुद्द ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारीच जुगाराची मैफिल बसल्याने अवैध धंद्यांचे जाळे जिल्हाभर पसरत असल्याची खात्री पटू लागली आहे. भालावल येथे बैठकीसाठी दोडामार्ग, बांदा, आणि गोवा येथून मोठमोठे खेळी जुगाराच्या बैठकीसाठी येत असून दिवस रात्र चालणाऱ्या अवैध जुगारात लाखोंची उलाढाल होत आहे. गोवा बांदा दोडामार्ग आदी भागातून येणाऱ्या जुगाराच्या खेळींना धोका उत्पन्न होऊ नये म्हणून जुगार्यांनी गावाच्या सीमेवर पहारेकरी बसवून योग्य ती काळजी घेतलेली आहे.
जिल्हाभर सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांमुळे पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवैध धंद्यांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण होऊ लागली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हा पोलिस प्रमुखांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची दखल घेऊन जातिनिशी कारवाई करावी तरच जिल्हा गुन्हेगारी मुक्तीकडे प्रवास करेल अन्यथा……

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 20 =