You are currently viewing मळगाव शारदा विद्यालयाचा इयत्ता चौथीचा निरोप समारंभ शिक्षकांच्या उपस्थितीत संपन्न…

मळगाव शारदा विद्यालयाचा इयत्ता चौथीचा निरोप समारंभ शिक्षकांच्या उपस्थितीत संपन्न…

सर्व विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना दिला उजाळा

सावंतवाडी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शारदा विद्यालय मळगाव शाळेतील इयत्ता चौथीच्या वर्गाचा निरोप समारंभ शाळेतील शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शारदा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षिका सीमा सावंत, शिक्षिका अस्मिता गोवेकर व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीपासून या शाळेच्या प्रत्येक शिक्षकाने आपल्याला छान छान गोष्टी सांगून तसेच विविध धडे देऊन आपल्याला कसे घडविले, आपण शाळेत कोणत्या गमती केल्या, सर्व शिक्षकांनीआपली कशी काळजी घेतली, याबाबत आपल्या अनेक आठवणी सांगितल्या.

यावेळी शाळेतील मुलांनी आपली आठवण म्हणून पोषण आहारावेळी जेवण बनविण्यासाठीचे मोठे भांडे शाळेला भेट दिले. निरोप समारोपावेळी मात्र मुलांना आपले अश्रू आवरत नव्हते. शाळेच्या सर्व शिक्षकांनी व पहिली, दुसरी व तिसरीच्या छोट्या मुलांनी चौथीच्या सर्व मुलांना भेट देत त्यांना पुढच्या शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा