You are currently viewing भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वैभववाडीत आरटीओ कॅम्प चा शुभारंभ..

भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वैभववाडीत आरटीओ कॅम्प चा शुभारंभ..

आमदार नितेश राणे यांचे रिक्षा संघटना पदाधिकारी व वाहनचालकांनी मानले आभार

वैभववाडी

वैभववाडी येथे आरटीओ कॅम्पचा शुभारंभ भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने हा कॅम्प तालुक्याच्या ठिकाणी पूर्ववत झाला आहे. कॅम्पसाठी वैभववाडीत दाखल झालेले मोटर वाहन निरीक्षक विजय अल्लमवार, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अरुण पाटील व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रवीण सातारे यांचा भाजपाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी नासीर काझी म्हणाले, मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळेच हा कॅम्प तालुक्याच्या ठिकाणी पूर्ववत झाला आहे. कोरोना काळात सदर कॅम्प संबंधित विभागाकडून बंद करण्यात आला होता. याचा फटका येथील वाहन चालक व मालकांना बसत होता. वाहनांची कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी कुडाळला जावे लागत होते. परंतु ही गैरसोय आता दूर झाली आहे.

यावेळी मोठ्या संख्येने वाहन चालक, मालक, नवीन लायसन्स धारक युवक उपस्थित होते. कॅम्प वैभववाडीत सुरू झाल्याने रिक्षा संघटना व इतर वाहन संघटना, वाहन चालक मालक यांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले. वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय पटांगणावर हा कॅम्प भरविण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्ष नेहा माईनकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, भाजपा पदाधिकारी बंड्या मांजरेकर, एस.एम. बोबडे, नगरसेवक डॉ. राजेंद्र पाताडे, रोहन रावराणे, विवेक रावराणे, राजन तांबे, नगरसेविका संगीता चव्हाण, रेवा बावदाने, यामिनी वळवी, सुप्रिया तांबे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर दळवी, जिल्हा रिक्षा संघटना उपाध्यक्ष सचिन तळेकर व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, वाहन चालक, रिक्षा संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा