You are currently viewing ओम गणेश सोसायटी महिला वर्गाचा कौतुकास्पद वाढदिवस उपक्रम

ओम गणेश सोसायटी महिला वर्गाचा कौतुकास्पद वाढदिवस उपक्रम

कुडाळ

कुडाळ इंद्रप्रस्थनगर येथील ओम गणेश गृहनिर्माण सोसायटी येथील महिलावर्गाने आज पणदूर येथील सविता आश्रमला भेट दिली.

समाजाप्रती असलेली भावनिक बांधिलकी जोपासत या महिलांनी आपल्या वाढदिवसाप्रती नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला. आपला वाढदिवस कौटुंबिक साजरा न करता सर्व महिलांनी ठराविक रक्कम काढुन जवळजवळ दहा हजार रुपये किंमतीचे जीवनावश्यक साहित्य या आश्रमास मदत म्हणून दिले. यावेळी आश्रमाचे अध्यक्ष श्री नरेश चव्हाण तसेच ओम गणेश सोसायटी महिला, सदस्य तसेच बालमंडळी उपस्थित होती.

यावेळी आश्रमातील कामकाज, येणाऱ्या समस्या, आवश्यक असलेली सुविधा याविषयी श्री.चव्हाण यांनी माहिती दिली.

एक वेगळा समाजाभिमुख उपक्रम राबवल्याबद्दल श्री.चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच आपला वाढदिवस चार भिंतीच्या आत बंदिस्त न राहता आपण काही काळ दुसऱ्यासाठी जगलो याचे समाधान महिलावर्गाच्या चेहऱ्यावर दिसत होते.

खरोखरच असे उपक्रम राबवून आपण सामाजिक बांधिलकी जोपासाणे ही काळाची गरज आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा