You are currently viewing सावंतवाडीत भटके-विमुक्त, कष्टकरी बहुजनांचे जनवादी साहित्य-संस्कृती संमेलन

सावंतवाडीत भटके-विमुक्त, कष्टकरी बहुजनांचे जनवादी साहित्य-संस्कृती संमेलन

उदघाटन कवी आणि सिनेदिग्दर्शक डॉ. नागराज मंजुळे यांच्या हस्ते तर संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार व लेखिका संध्या नरे-पवार यांची विशेष उपस्थिती

 

सावंतवाडी :

 

भटके-विमुक्त, कष्टकरी बहुजनांच्या मुक्तीदायी राजकरणाच्या बाजूने सांस्कृतिक हस्तक्षेप जनवादी साहित्य-संस्कृती संमेलन, सावंतवाडी २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन कवी आणि सिनेदिग्दर्शक डॉ. नागराज मंजुळे करणार आहेत तर संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार व लेखिका संध्या नरे-पवार असणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून शिक्षक चळवळीचे नेते संजय वेतुरेकर हे आहेत. रविवार ८ व सोमवार ९ मे २०२२ गुरूवर्य सत्यशोधक कृष्णाजी अर्जुन केळुसकर संमेलननगरी आर.पी.डी. हायस्कूल पटांगण, सावंतवाडी येथे हे संमेलन होणार आहे.

 

समारोप : सन्माननीय अतिथी म्हणून रेहमान अब्बास( प्रसिद्ध उर्दु लेखक)डॉ. वंदना सोनाळकर (ज्येष्ठ विचारवंत) हे उपस्थित राहणार आहेत.

शनिवार ७ मे २०२२

सायंकाळी ५ वा. ग्रंथदिंडी आणि शोभायात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समता प्रेरणा भुमी ते गुरूवर्य सत्यशोधक कृष्णाजी अर्जुन केळुसकर संमेलन नगरी आर.पी.डी.कॉलेज सावंतवाडी

रविवार ८ मे २०२२

उद्घाटक सत्र : सकाळी ११ ते २

प्रास्ताविक : संपत देसाई

स्वागताध्यक्ष भाषण : संजय वेतुरेकर

उद्घाटकांचे भाषण : नागराज मंजुळे कवी आणि सिने दिग्दर्शक

प्रा. नवनाथ शिंदे सामाजिक कार्यकर्ते, आजरा

सिद्धार्थ देवधेकर कथ, लेखक, लांजा, दुर्गादास गावडे ज्येष्ठ आदिवासी कार्यकर्ते गोवा

संमेलनाध्यक्षांचे भाषण : संध्या नरे-पवार ज्येष्ठ पत्रकार व लेखिका

विशेष निमंत्रित : विकास सावंत अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी

किशोर जाधव माजी अध्यक्ष, विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र

सुबोध मोरे निमंत्रक, दलित पँथर सुवर्ण महोत्सव समिती महाराष्ट्र

चंद्रकांत जाधव ज्येष्ठ लेखक, गोवा

सूत्रसंचलन : सुरेश दास, योगेश सकपाळ

आभार : मधुकर मातोंडकर

जेवण दुपारी २ ते ३

 

सत्र २ रे : परिसंवाद – सायंकाळी ३ ते ५.३०

विषय : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव-आमच्या स्वातंत्र्याचे काय झाले ?

अध्यक्ष : डॉ. उमेश बगाडे ज्येष्ठ इतिहासकार, औरंगाबाद

सहभाग : डॉ. प्रदीप आवटे, उल्का महाजन, सरफराज अहमद, धम्मसंगिनी रमागोरख, शैला यादव

प्रस्तावना : मिलिंद माटे

सूत्रसंचलन : सरिता पवार

आभार : संघमित्रा जाधव

सायंकाळी ५.३० ते ६.३० सत्यशोधक शाहिरी जलसा

 

सत्र : ३ रे कवि संमेलन-सावंतवाडी ६.३० ते ९

अध्यक्ष : लोकनाथ यशवंत, नागपूर

निमंत्रित व सहभागी कवी : संतोष पवार, अनिल धाकू कांबळी, संध्या तांबे, रफिक सूरज, एकनाथ पाटील, वीर धवल परब, श्यामसुंदर मिरजकर, अरूण नाईक, विठ्ठल कदम, सिद्धार्थ तांबे, मोहन कुंभार, नमन धावस्कर, अभिजीत पाटील (मिरज), लता ऐवळे-कदम(सांगली), सरिता पवार, राजेश कदम, स्नेहा कदम, दिपक पटेकर, सुनिता खाडे, रवि प्रकाश करंबळीकर, निलम यादव-कांबळे, श्वेतल परब, मधुकर जांभळे(गडहिंग्लज), डॉ. महेश पेडणेकर(बांदा), मिलिंद माटे(गोवा), डॉ. जयेश प्रभू, निखिल प्राजक्ते, आनंद कौशल्य, सफर अली इसफ, सुभाष कोरे (गडहिंग्लज), नारायण खोर्जुवेकर, सत्यवान पेडणेकर(गोवा), अनिता जाधव, क्रांतीराज सम्राट, रावसाहेब मुर्गे(गडहिंग्लज), प्रा. निलेश शेळके(माण, सातारा), मंदा धनराज सुगीरे(गोवा), हर्षवधींनी सरदार, ऋतुराज सावंत-भोसले, शालिनी मोहाळे, कल्पना बांदेकर, अनुज केसरकर, भीमराव तांबे, मुर्ती कासार, गोविंद पाटील, राष्ट्रपाल सावंत, संदेश पवार

जेवण रात्री ९.०० वा

रात्री : ९.३० वा. दलित पँथर कवितांचे नाट्यीकरण मी भयंकराच्या दारवाजात उभा आहे !

१०.३० वा. वर्तमानावर भाष्य करणारे नाटक मोस्ट वेलकम

सोमवार ९ मे २०२२

 

सत्र ४ थे गटचर्चा व संकलन सकाळी ९ ते १०.३०

विषय : १. दलित पँथर चळवळीचा कला, साहित्य आणि संस्कृतीवरील परिणाम

अध्यक्ष : सिद्धार्थ तांबे, सूत्र संचलन : संतोष पेडणेकर

विषय : २. काश्मिर फाईल्स, ध्रुवीकरणासाठी चित्रपट माध्यमाचा उपयोग केला जात आहे काय ?

अध्यक्ष : रणजित कालेकर, सूत्रसंचालन : युवराज जाधव

विषय : ३. महापूर आणि कोसळणाऱ्या दरडी : जबाबदार कोण ?

अध्यक्ष : सत्यजित चव्हाण, सूत्रसंचलन : पराग गावकर

विषय : ४. कुटुंब, धर्म आणि संस्कृतिच्या क्षेत्रात स्त्रियांचा हस्तक्षेप : मुक्तीदायी की शरणगामी ?

अध्यक्ष : विद्या तावडे, सूत्रसंचलन : स्वाती तेली

विषय : ५. गोवा समजून घेताना

अध्यक्ष : प्रभाकर ढगे, सूत्रसंचलन : नारायण खराडे

विषय : ६. नवीन शैक्षणिक धोरण आणि बहुजनांचे शिक्षण

अध्यक्ष : डॉ. उल्हास चांदेलकर, सूत्रसंचलन : महेश पेडणेकर

विषय : ७. तीन कृषी कायदे, सत्ताधारी कोणाच्या बाजूने ?

अध्यक्ष : कृष्णा पाटील, सूत्रसंचलन : सुधीर नलावडे

विषय : ८. पर्यायी सांस्कृतिक राजकारण आणि समतेची प्रतिके

अध्यक्ष : मल्लिका माटे, सूत्रसंचलन : अमोल कांबळे

गटचर्चा संकलन : अध्यक्ष : गौतम तांबे

सुत्रसंचलन : वैभव खानोलकर, आभार : सुष्मिता चव्हाण

 

सत्र ५ वे – परिसंवाद सकाळी १०.३० ते १.००

विषय : आजच्या मराठी साहित्यातील दलित, आदिवासी, ग्रामीण, शहरी कष्टकरी स्त्री-पुरूषांचे जीवन दर्शन

अध्यक्ष : राजन गवस, ज्येष्ठ साहित्यिक

वक्ते : महेंद्र कदम, वंदना महाजन, सचिन गरूड, नारायण भोसले, दत्ता घोलप, नमन धावस्कर

प्रास्ताविक : प्रा. सोमनाथ कदम

सूत्रसंचलन : प्रा. सुनिल भिसे

आभार : संतोष पाटणकर

१ ते २ सांस्कृतिक कार्यक्रम

जेवण : २ ते ३

सत्र ६ वे- परिसंवाद-दुपारी ३ ते ५

विषय : सांस्कृतिक दहशतवाद : साहित्यिक, कलावंत, बुद्धीजीवींची भूमिका

अध्यक्ष : प्रविण बांदेकर, कवी व कादंबरीकार

वक्ते : हुमायुन मुरसूल, सचिन परब, अजय कांडर, बालाजी सुतार, शर्मिष्ठा भोसले

प्रास्ताविक : डॉ. प्रज्ञाकुमार गाथाडे

सूत्र संचलन : नरेंद्र पाटील

आभार : विजय ठाकर

समारोप सत्र : सायंकाळी ५ ते ७

रेहमान अब्बास, सुप्रसिद्ध उर्दु लेखक

डॉ. वंदना सोनाळकर, ज्येष्ठ विचारवंत

संध्या नरे-पवार, संमेलनाध्यक्ष, जनवादी साहित्य संस्कृती संमेलन, सावंतवाडी

सूत्रसंचलन : प्रा. रूपेश पाटील,

आभार : प्रतिभा चव्हाण

प्रास्ताविक : अंकुश कदम

 

बहुजनांच्या मराठीवर प्रेम करणाऱ्या तरूणतरूणींनो, स्त्री-पुरूषांनो, साहित्यिक-विचारवंतांनो, साहित्य संस्कृतीची क्षेत्रे ही जितकी मुक्त मोकळी आणि अनिर्बंध असतील तितकी समतेवर आधारलेल्या सदृढ समाजासाठी पोषक असतात. पण अलिकडच्या काळात तसे होताना दिसन नाही. साहित्य आणि एकंदरीत संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये धर्मांध जातीयवादी शक्ती धुमाकुळ घालत आहेत. लेखक, कवी, विचारवंतांसह कलावंतांची कोंडी करताना कोणी काय लिहावे, कोणी काय लिहू नये हेही झुंडीच्या पद्धतीने सांगू लागले आहेत. इतकेच नव्हेतर संस्कृती रक्षणाच्या नावाखाली दलित, आदिवासी, भटके, स्त्रियांसह मुस्लिम, ख्रिश्चन अल्पसंख्यांक समूहाचे नैसर्गिक हक्क नाकारून त्यांची मुस्कटदाबी केली जात आहे.

या अशा कठीण काळात आपण सर्वांनी एकत्र येत अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी बहुजनांच्या सृजनशील निर्मितीचा जागर करणे आम्हाला महत्वाचे वाटते.

 

म्हणूनच आम्ही रविवार ८ मे व सोमवार ९ मे रोजी सावंतवाडी येथे जनवादी साहित्य संस्कृती संमेलन घेत आहोत. चार्वाक, गौतम बुद्ध ते कार्ल मार्क्स, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारख्या क्रांतिकारक विचारांची मांडणी करणाऱ्या युगप्रवर्तक परंपरेच्या खांद्यावर उभी राहिलेल्या दलित पँथर या क्रांतिकारी झंझावाती वादळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. ज्या काळात जातीय धार्मिक अत्याचाराच्या विरोधात पँथर उभी राहली तीच परिस्थिती आज आपल्या अवती भवती दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग, गोवा आणि दक्षिण कोल्हापूर जिल्ह्यातील परिवर्तनवादी चळवळींच्या वतीने हे साहित्य संस्कृती संमेलन आयोजित केले आहे.

 

या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, कष्टकरी बहुजनांच्या मुक्तीदायी राजकारणाच्या बाजूने सांस्कृतिक आवाज बुलंद करूया. संपत देसाई(अध्यक्ष), मधुकर मातोंडकर(उपाध्यक्ष), मिलिंद माटे(उपाध्यक्ष), प्रतिभा चव्हाण(कार्याध्यक्ष), अंकुश कदम(सेक्रेटरी), संतोष पाटणकर(खजिनदार), प्रा. रूपेश पाटील(उपसचिव), मोहन जाधव(प्रसिद्धी), रणजित कालेकर(प्रसिद्धी), युवराज जाधव(सोशल मिडीया), योगेश सकपाळ(सोशल मिडीया)

 

सदस्य : अमोल कांबळे, परमेश्वर सावळे, प्रज्ञा मातोंडकर, दिपक दाजी कदम, सिद्धार्थ गोपाळ तांबे, स्वाती तेली, महेश पेडणेकर, उषाकिरण सम्राट, डॉ. प्रज्ञाकुमार गाथाडे, डॉ. सुनिल भिसे, दिपक पटेकर, प्रकाश मोरस्कर, राम माने, मारूती चंदर पाटील, विठ्ठल कदम, अर्जुन जाधव, सुधाकर पेडणेकर, अॅड. जितेंद्र गावकर, अॅड. प्रिती गावडे, मल्लिका माटे, सरिता पवार, सुरेश पवार, विजय ठाकर, दिपक जाधव, विकास वराडकर, सुभाष गोवेकर, निलेश जाधव, निलिमा जाधव, जितेंद्र पेडणेकर, सुजित सावंत, राजेश सखाराम माने, डॉ. उल्हास चांदेलकर, विद्या तावडे, सत्यवान पेडणेकर, नारायण खराडे, प्रविण गांगुर्डे, प्रभाकर ढगे, संतोष पेडणेकर, शंकर जाधव, दत्ता वावधने, राजेंद्र कांबळे, गणेश म्हापणकर, अर्पित शांडिल्य, परिक्षित शर्मा, रमेश जाधव, रवी जाधव, मनिष नारायण तांबे, सुधांशू गौतम तांबे, कृष्णा सावंत, संजय गाडगे, काशिनाथ मोरे, वंदन जाधव, बजरंग पुंडपळ, अशोक शिवणे, नरेंद्र पाटील, निलेश जाधव, दिपक जाधव, प्रा. निलम कांबळे. संयोजक समिती, जनवादी साहित्य-संस्कृती संमेलन, सावंतवाडी अधिक माहितीसाठी संपर्क : संपत देसाई ,प्रतिभा चव्हाण किंवा अंकुश कदम : ८७८८८९६०४२ यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − eleven =