You are currently viewing कणकवली येथील एका (बा)जूक साजूक हॉटेल आणि लॉजिंग मध्ये सुरू आहेत टिंगेलचे अनैतिक व्यवसाय

कणकवली येथील एका (बा)जूक साजूक हॉटेल आणि लॉजिंग मध्ये सुरू आहेत टिंगेलचे अनैतिक व्यवसाय

टिंगेल मेंथेरोला आशीर्वाद कोणाचा?

जुगाराचे बादशाह म्हणून जिल्ह्यात ओळख असणाऱ्या कणकवली येथील टिंगेल मेंथेरो याचे जुगारा बरोबरच सोशल क्लब च्या नावावर अनैतिक व्यवसाय देखील सुरू आहेत. जिल्ह्यात जुगाराच्या मोठमोठ्या बैठकी टिंगेल मेंथेरो घेत असतो. अनैतिक आणि गैर धंद्यातून टिंगेल मेंथेरो ने मोठी माया गोळा केली आहे.
टिंगेल मेंथेरो ने आपल्या अनैतिक व्यवसायासाठी तर आता कणकवली येथील एक (बा)जूक साजूक हॉटेलचं निवडले आहे.. हॉटेल आणि लॉजिंग असणाऱ्या साजूक तुपातलं खाणाऱ्या (बा)जूक हॉटेलात टिंगेल मेंथेरोचे अनैतिक व्यवसाय, क्लब, जुगार जोरदार सुरू आहेत. अशांत इडये यांच्या नावावर लायसन्स असून सदरची हॉटेलची प्रॉपर्टी ही बाईक नामक इसमाची असून टिंगेल मेंथेरोने हे हॉटेल चालवायला घेतलं आहे. स्थानिक लोकांना व्यवसायात पार्टनरशिप दिली जात असून तीस लोकांमध्ये पाच, दहा, वीस, पन्नास रुपये पॉईंट गेम खेळले जातात. 14/ बाजी घेतल्यामुळे हजारो रुपये गेमवर लावतात आणि दिवसाकाठी लाखोंची उलाढाल होते. कणकवली शहरातील भर बाजारपेठेत खुलेआम अनैतिक व्यवसाय सुरू असल्याने जुगाराचा बादशाह टिंगेल मेंथेरो ला नक्की कोणाचा आशीर्वाद आहे? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.
जिल्ह्यात नैतिकतेने धंदे करणाऱ्या लोकांना देखील धंदा करताना अनेक सर्कशी कराव्या लागतात परंतु अनैतिक धंदे, क्लब, जुगार चालवायला मात्र केवळ एका आशीर्वादावर सर्व सुरळीत होत असतं, हे टिंगेल मेंथेरोच्या कणकवलीत सुरू असणाऱ्या गैर धंद्यांवरून दिसून येतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा