You are currently viewing कुंदे आंबेडकरनगर समाजभवनाचे उदघाटन व विकास कामांची भूमिपूजने आ. वैभव नाईक यांच्या हस्ते संपन्न 

कुंदे आंबेडकरनगर समाजभवनाचे उदघाटन व विकास कामांची भूमिपूजने आ. वैभव नाईक यांच्या हस्ते संपन्न 

 

आमदार वैभव नाईक यांच्या आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत ५ लाख रु.निधीतून कुंदे गावातील आंबेडकरनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभवन उभारण्यात आले आहे. रविवारी या समाजभवनाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. तसेच कुंदे मुख्य रस्ता ते लवू कदम विजय राणे यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी २५/१५ अंतर्गत ५ लाख रु निधी व कुंदे श्री.रवळनाथ मंदिर परिसर सुशोभीकरण करणे यासाठी “क” वर्ग पर्यटन अंतर्गत ५ लाख निधी आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला असून या दोन्ही कामांची भूमिपूजने आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

 

यावेळी कुंदे सरपंच सचिन कदम ,उपसरपंच सुशिल परब, शिवसेना शाखा प्रमुख विरेश परब ,तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष रमेश परब, ग्रामपंचायत सदस्य रुपेश तायशेटे, लीना कदम,अनिता कदम, प्रितम कदम, ज्योती कुंदेकर,संदीप राणे, मंगेश कदम, आणा राणे, महेश परब, गजानन गावडे, गौरीशंकर कदम, सुनिल पवार, नागेश पवार, विशाल पवार ,तसेच कुंदे गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + twenty =