You are currently viewing बांदा ग्रामपंचायतीला श्री संत सोहीरोबानाथ आंबिये यांचे तैलचित्र भेट

बांदा ग्रामपंचायतीला श्री संत सोहीरोबानाथ आंबिये यांचे तैलचित्र भेट

*बांदा ग्रामपंचायतीला श्री संत सोहीरोबानाथ आंबिये यांचे तैलचित्र भेट*

बांदा

येथील पुण्य भूमीत जन्मलेल्या संत श्री सोहिरोबानाथ आंबीये यांचे तैलचित्र भक्तांच्या मागणीनुसार येथील ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आले आहे. नुकतेच हे चित्र सौ.श्वेता कोरगावकर, श्री.गुरु कल्याणकर व श्री.आशुतोष भांगले यांनी सरपंच प्रियांका नाईक यांच्याकडे सुपूर्द केले.

संत सोहिरोबानाथ आंबीये यांनी या भूमीत जन्म घेतला असून त्यांनी या भागातील जनतेला भक्तीचा मार्ग दाखविला. हे बांदावासियांसाठी अभिमानास्पद आहे. आंबीये महाराज यांचे कार्य व अभंग वारकरी व संत संप्रदायात महत्वाचे असून त्यांचे अभंग आजही महाराष्ट्र, गोवा राज्यात व देशाच्या कानकोपऱ्यात त्यांच्या अस्तित्वाची आठवण करून देतात. यासाठी त्यांनी केलेल्या समाजसेवेच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांचे तैलचित्र ग्रामपंचायत कार्यालयात लावावे यासाठी भक्त गणांकडून तैलचित्र भेट देण्यात आले.

यावेळी सरपंच प्रियांका नाईक व ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये उपस्थित होत्या. महाराजांचे तैलचित्र कार्यालयात लावण्याचे आश्वासन सरपंच नाईक यांनी यावेळी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा